फेस्टिव्ह सीझनसाठी दरवेळी वॉर्डरोबमध्ये नवीन अॅक्सेसरीज घेणं काही प्रत्येक वेळी शक्य होत नाही. मग आहे त्यामध्येच काही वेगळं करता येईल का? मिक्स अॅण्ड मॅचचा नवा फंडा एथनिक तरीही नव्या लूकसाठी..
दिवाळी झाल्यानंतर काही दिवस शॉपिंगचा श् सुद्धा काढता येत नाही. आधीच दिवाळीनिमित्त भरपूर खरेदी झालेली असते ना! दिवाळीचं शॉपिंग म्हटलं की, कितीही करा, आपली हौस काय भागत नाही. पण हौसेला मोल नसलं तरी, आईबाबांनी आखून दिलेल्या बजेटला मात्र मर्यादा असतातच ना.. मग अशा वेळी काय करायचं तर, आपल्याकडे असलेल्या बजेटमध्ये तडजोड करत, वॉडरोबमध्येच काही तरी जुगाड करून नवीन लूक तयार करायचा. तुमच्या डोळ्यांसमोरील हीच जुगाडाची अडचण लक्षात घेऊन, यंदाच्या ट्रेण्डला साजेशा, पण तुमच्या खिशाला जास्त फटका लावणार नाहीत, अशा काही क्लृप्त्या देण्याच्या उद्देशानं हा लेख.
दिवाळीनंतर आता लग्नसराई सुरू होईल. कुठल्याही समारंभाला जातानाचा एक परफेक्ट लूक परफेक्ट क्लचशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. एखाद्या पारंपरिक पोशाखाला शोभेल असा क्लच हातात घेऊन फिरणं त्या सगळ्याला एक वेगळाच टच देऊन जातं. पण एखाद्या फंक्शनसाठी खास त्या दिवसापुरता घेतलेला क्लच वर्षभर वॉर्डरोबमध्ये तसाच पडून राहतो. त्यापेक्षा हल्ली क्लचेसना पर्याय म्हणून रेप्टाइल िपट्र किंवा अॅनिमल प्रिंटच्या अॅक्सेसरीज बाजारात आल्या आहेत. या क्लचेसमध्ये भपकेदार रंगांपेक्षा लाइट आणि डोळ्यांना प्रसन्न वाटणाऱ्या शेड्स वापरण्यावर भर दिला गेलेला दिसतो आणि बेस कलर सटल असल्यामुळे बहुतेक सर्वच आऊटफिट्सवर मॅच होतं.
सध्या बाजारात दिसणाऱ्या वेगवेगळ्या कलेक्शनमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे मोहक आणि स्त्रीसुलभ अशा कटवर्क्सचा. मग अगदी अनारकली, ड्रेसेसपासून ते क्रॉप टॉप्स, चोकर्स, बॅग्ज किंवा अगदी बुटांमध्येही कटवर्कचा वापर होतोय. अॅक्सेसरीजना कटवर्कमुळे खूप इंटरेस्टिंग लूक येतोय. कटवर्क केलेल्या बॅग्स, शूज अशा अॅक्सेसरीज सहस मिक्स मॅच करता येतात.
एरवी पार्टीला वापरले जाणारे सिलेटोज फेस्टिव्ह लूकला पण चारचाँद लावतात. बेज, ब्राऊन, लाल, गोल्डन रंगाच्या सिलेटोज वॉर्डरोबमध्ये नाहीत, अशी मुलगी सापडणे कठीणच. हे सिलेटोज तुमच्या अनारकलीजवर मस्त मॅच होतात. या दिवाळीत जर तुम्हाला नेहमीच्या जड कानातल्यांपेक्षा काही ट्रेण्डी आणि क्लासी ट्राय करायचं असेल तर ईयरकफ्सचा एक ऑप्शन तुमच्याजवळ आहे. या ईयरकफ्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ग्रीक देवतेचा लूक हवा असेल तर तुम्ही धातूचे ईयरकफ्स वापरू शकता, ऑक्सिडाईज्ड मेटल अँटिक लूक देईल. यामुळे सौंदर्य खुलेल आणि ते पारंपरिक वेशालाही साजेसं असेल.
अशाच वेगवेगळ्या रंगांमधला एक उठावदार रंग केशरी. केशरी रंगाचे कपडे आणि अॅक्सेसरीज वापरून तुम्हाला तुमच्या एकूणच पेहरावाला एक लालसर नारिंगी उठाव देता येईल.
जुन्या नव्याची सांगड घातली गेली तर नक्कीच काही तरी वेगळं अनुभवायला मिळेल. लेट्स ट्राय इट !
गो फॉर समिथग अनकॉमन :
* कानातले जर बिंदी म्हणून वापरले तर? तुम्हाला फक्त पुष्कळ बॉब पिन्स लागतील आणि हूक असलेलं कानातलं लागेल.
* लांबलचक चेन किंवा दोन-तीन पातळ चेन्स तुम्ही कंबरपट्टा म्हणून वापरू शकता. नेकलेस हेअर अॅक्सेसरी म्हणून वापरता येईल.
* नेहमीचे ब्रेसलेट तुम्ही बाजूबंद म्हणूनही वापरू शकता. कफ ब्रेसलेट्सची निवड बाजूबंदांसाठी एक चांगली निवड ठरू यासाठी योग्य ठरू शकते.
* ब्रेसलेट आणि रिंगच्या मध्ये एक चकाकती चेन जोडून तुम्ही तुमच्यासाठी हातफूल तयार करू शकता.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2014 रोजी प्रकाशित
परंपरेला नवा साज ..
फेस्टिव्ह सीझनसाठी दरवेळी वॉर्डरोबमध्ये नवीन अॅक्सेसरीज घेणं काही प्रत्येक वेळी शक्य होत नाही. मग आहे त्यामध्येच काही वेगळं करता येईल का? मिक्स अॅण्ड मॅचचा नवा फंडा एथनिक तरीही नव्या लूकसाठी..
First published on: 31-10-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mix and match fashion funda