गायत्री हसबनीस, वैष्णवी वैद्य viva@expressindia.com
लहानपणी कारण नसताना बाहेर जाण्याचा हट्ट धरला की आई म्हणायची, ‘आता नाही हं जायचं नाहीतर बागुलबुवा तुला पकडेल’, असं म्हणत खरंच त्या बागुलबुवाने आपल्याला जवळजवळ गेले दोन वर्ष धरूनच ठेवलंय! होय..होय.. दोन वर्ष,  कारण हां हां म्हणता २०२२ हे वर्ष अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलं आहे. तरुणांच्या मीमकरी भाषेत सांगायचं झालं तर ‘२०२२ लोडिंग सून’..!

२०२० हे वर्ष कसं गेलं आपल्याला कळलंही नाही. नाहीच कळणार कारण ते वर्ष कधी संपतंय याचीच आपण वाट पहात होतो.. अगदी आतुरतेने. याआधी असं कोणतंच वर्ष नसेल ज्याची ते कधी संपतेय याची एवढी वाट आपण पाहिली असेल. ३१ डिसेंबर २०२०? चे बारा वाजून गेले आणि २०२१ चे सगळ्यांनी काहीशा साशंकतेनंच स्वागत केलं. फेसबुक किंवा इन्टाग्रामवरचं असं एकही अकाऊंट नसेल ज्यावर २०२१ च्या पहिल्याच दिवशी या वर्षांची प्रचंड आनंदाने आणि उत्साहाने स्वागत के ल्याची पोस्ट नसेल. वास्तविक, २०२० हे सगळ्यांच्या आयुष्यातील अत्यंत वाईट असं वर्ष ठरलं होतं तेव्हा ते वर्ष संपतंय म्हणजे अर्थात आपल्या आयुष्यातली मरगळ, नकारात्मकता गेली या आनंदात लोक होतेच, नव्या वर्षांच्या उत्साहाने ते अधिक आनंदात होते. अर्थात याही वर्षी दु:खाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा वेगाने आली आणि नकळतच काळ वेगाने पुढे सरकला. होता होता सप्टेंबर महिना उजाडला आणि तरुणाईला पुन्हा पुढच्या वर्षांची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर तरुणाईने मीम्सच्या माध्यमातून हेही वर्ष संपायला फक्त चार महिने उरले आहेत याचा जागर करायला सुरुवात केली आहे.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
jayant patil praful patel
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, “त्यांना पक्षसंघटना…”
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न

येणारा वाढदिवस तरी लॉकडाऊन बड्डे नसावा असं प्रत्येकालाच वाटतंय. तरुणांची कधीही यशस्वी न होणारी गोवा ट्रीप निदान प्लॅन तरी व्हावी असं त्यांना राहून राहून वाटतंय. सणावाराचे चांगले कपडे बहुधा आता जुने देऊन नवीनच घ्यावे लागतात की काय असंही सगळ्यांना वाटू लागलं आहे. जवळ जवळ दोन वर्ष ते घालून मिरवण्यासाठी समारंभच झाले नाहीत. स्वप्नातली भटकंती २०२२ मध्ये तरी सत्यात उतरेल अशी आशा सगळे बाळगून आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी तरुणांकडे ट्रेण्ड असतो, मग ही गोष्ट तरी ट्रेण्ड कल्चरपासून अलिप्त कशी राहिल? ‘२०२२ कमिंग सून’ अशा अर्थाचे अनेक गमतीदार मीम्स सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. ‘फ ोर मंथ्स लेफ्ट टू एन्ड २०२१’ हे वाक्य सगळ्यांना आता जीवघेणं वाटतं आहे, कारण या वाक्याखाली चित्रपटातील कुठल्याही पात्रांचे दु:खी, आश्चर्यचकित, हवालदिल, घाबरट असे असंख्य हावभाव असलेल्या फोटोंसह भन्नाट मीम्स तूफान व्हायरल होतायेत. हे मीम्स पाहून २०२० चं अनपेक्षित वर्ष आता कुठे आम्ही पचवतो आहोत आणि चक्क पापणी लवायच्या वेगात २०२१ जाऊन २०२२ समोर  येऊन ठेपलंय.. ही भावना तरुणाईच्या मनात घर करते आहे. २०२० ही पहिली लेव्हल आपण पार केली, २०२१ ची दुसरी लेव्हल आपली वाट पहात आहे, अशा पद्धतीचे मीम्स गेल्या वर्षीही व्हायरल झालेले आपण पाहिले होते. २०२२ ची लेव्हल कुठली लाट घेऊन येईल काय सांगावं! पण येत्या वर्षी ठरवलेले प्लॅन तरी फसू नयेत अशी अपेक्षा सगळेच करत आहेत. परवाच एका मैत्रिणीने हे वर्ष संपायला चारच महिने शिल्लक असल्याच्या आशयाचा ‘भाडिपा’चा मीम बघितल्यावर पहिल्यांदा हसू आलं, आश्चर्यही वाटलं पण नंतर जेव्हा जाणीव झाली तेव्हा वाईट वाटल्याची भावना व्यक्त के ली. तिने ती भावना कुठेतरी शेअर करावी म्हणून तिच्या स्टेटसला ते मीम ठेवले. तिच्या मित्रमैत्रिणींच्याही अशाच प्रतिक्रिया तिला मिळाल्या. मीमकर एरव्ही आपल्याला आपण वर्षांचे किती महिने फुकट घालवतो यावर हसवत असतात, पण सध्या ते किती महिने शिल्लक राहिलेत याची आठवण करून देत हसवतायेत.

नुकतीच शाळा संपवून कॉलेज लाइफची स्वप्नं बघणाऱ्या टीनेजर्सना या वर्षी तर परीक्षा, अभ्यास मग प्रवेशासाठी धडपड करावी लागते आहे. आता त्यांनाही जाणीव झालीये की आता हे वर्ष तर संपलंच त्यामुळे खरंखुरं कॉलेजदर्शन अगले साल! कॉलेजच्या कोवळ्या तरुणाईचीही हीच अवस्था! लेक्चर बंक करणं, धमाल मस्ती, राडे, खाणं पिणं, मज्जा, फिरणं हे नशिबातच नव्हतं. सगळं काही ऑनलाइनच असल्याने वर्षही ऑनलाइन सुरू झालं आणि संपतंदेखील ऑनलाइनच आहे. पण या काळाने आपलं जग अगदी व्हच्र्युअल करून टाकलं आहे. या व्हच्र्युअल जगाचीही वेगळीच गंमत आहे बरं का.. ऑफिसचा व्हिडीओ कॉल सुरू असताना अंगावर चांगले कपडे आणि खाली मात्र शॉर्ट्स किंवा हाफ पँट असा आपला अवतार असायचा. त्या कामाबरोबर व्हिडीओ ऑफ असताना चक्क आपण भाजीही चिरलेली आहे. आपण माइक ऑन करावा अन् तितक्यात घरातून कोणीतरी भाडय़ांचा आवाज करावा किंवा शेजारच्याचं कार्ट किंचाळावं हे तर समीकरणच झालं आहे.  कधी एकदा वेब सिरीजचा पुढचा सीझन येतोय आणि आपण बघतोय, कारण आता निवांत वेळ मिळतोय शिवाय प्रवास नसल्यामुळे नॉनस्टॉप कनेक्शन असेल. किती बदललंय जग आपलं..

२०२१ चे ब्रीद वाक्य माहीत आहे का तुम्हाला? ‘आर यू वॅक्सिनेटेड?’..हेच ते. गेल्या दोन वर्षांत आपण एकच दागिना रोज घालून अगदी अभिमानाने मिरवतोय, उलट कोणी घातलं नाही तर त्याला दंड होतोय. आपलं तोंड खऱ्याअर्थाने बंद करणारा हा दागिना म्हणजे मास्क. एककीडे वर्क फ्रॉम होमवाल्यांना तर आधीच्या धावपळीची सवयच उरलेली नाही. तर दुसरीकडे रोजच्या आंघोळीचा कंटाळा करणारे आपण आता चक्क दिवसभरात दोन – दोनदा आंघोळ करू लागलोय.. अशा अनेक बदललेल्या गमती जमतींची आठवण या मीम्सनी करून दिली आहे. आणि याच गमती पुढे नेत येणारं नवं वर्षही आपली वाट पाहतंय.. चला मग लवकरच लोड करूयात २०२२!!!