वेदवती चिपळूणकर परांजपे

वुमेन्स आयपीएलची धामधूम सध्या सगळीकडे सुरू आहे. वुमेन्स आयपीएलच्या या सामन्यांमध्ये अनेक भारतीय तरुण महिला क्रिकेटर्सचे चेहरे सध्या सगळय़ांचं लक्ष वेधून घेत आहेत. यात सध्या जाहिरातीतूनही लक्ष वेधून घेते आहे ती शफाली वर्मा. वयाच्या पंधराव्या वर्षीपासून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी शफाली वयाने लहान असूनही तिच्या कीर्तीचा झेंडा सगळीकडे डौलात फडकतो आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लावण्यात आलेल्या टॉपच्या खेळाडूंपैकी एक असलेली शफाली आताही दिल्ली कॅपिटल्स टीमकडून खेळत वुमेन्स आयपीएलमध्ये मैदान गाजवते आहे..

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

वयाने ती केवळ वीसच वर्षांची आहे. मात्र तिच्या यशाचा चढता आलेख तिच्या पंधराव्या वर्षीच सुरू झाला आहे. २०२१ मध्ये भारतातली सर्वात लहान क्रिकेटर होण्याचा मान पटकावणारी ही क्रिकेटर आहे शफाली वर्मा. क्रिकेटचे तीनही – अर्थात टेस्ट, वन-डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी-  अशा फॉरमॅट्समध्ये संपूर्ण जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुरुष आणि महिला या दोघांमध्येही ती सर्वात तरुण खेळाडू ठरली. वयाच्या पंधराव्या वर्षी ती जागतिक वुमन्स ट्वेंटी – ट्वेंटी मध्ये भारताकडून क्रिकेट खेळली. २०२२ मध्ये ती ट्वेंटी-ट्वेंटी इंटरनॅशनल मध्ये एक हजार रन्सचा टप्पा पूर्ण करणारी सर्वात तरुण क्रिकेटर ठरली. शफालीच्या नेतृत्वाखाली  भारताने २०२३ मध्ये अन्डर-१९ वुमन्स ट्वेंटी-ट्वेंटी वल्र्ड कप जिंकला.

शफाली मूळची रोहतक, हरियाणाची! जिथे मुलींची लग्नं दहाव्या-बाराव्या वर्षी लावून देत असत, तिथे मुलीने क्रिकेट खेळणं म्हणजे समाजाला न चालण्यासारखीच गोष्ट! त्यामुळे शफाली लहानपणी मुलाच्या वेषात क्रिकेट खेळायला जायची. तिच्या वडिलांना ही कल्पना मनापासून मान्य नसतानाही त्यांनी तिला पाठिंबा दिला, मदत केली. अशा पद्धतीने सराव करताना पकडले जाण्याची पूर्ण शक्यता असतानासुद्धा शफालीने हे धाडस केलं. ती लहानपणापासून क्रिकेट खेळायला लागली आणि एकप्रकारे तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपूर्वी, ती महिला ट्वेंटी ट्वेंटी चॅलेंजमध्ये  Velocityसाठी खेळली ज्यामध्ये तिने ३१ चेंडूत ३४ धावा केल्या. २०१९ मध्ये, तिला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ट्वेंटी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय (WT20) संघात स्थान देण्यात आलं. तिने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वयाच्या पंधराव्या वर्षी भारतासाठी  WT20  पदार्पण केले. ती भारताकडून    T20 सामन्यात खेळणारी सर्वात तरुण खेळाडू होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अर्धशतक करणारी सर्वात तरुण क्रिकेटर बनली. वेस्ट इंडिजविरुद्ध, तिने पाच सामन्यांमध्ये १५८ रन्स  केले आणि तिला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आलं.

 २०२१ मध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या मालिकेसाठी तिला भारताच्या कसोटी आणि महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (WODI) संघात स्थान देण्यात आले. शफाली वर्माने १६ जून २०२१ रोजी भारताकडून इंग्लंडविरुद्ध टेस्टमध्ये डेब्यू केला. तिने तिच्या पहिल्या कसोटी डावात ९६ धावा केल्या. टेस्ट मॅच अनिर्णित राहिली आणि तिला तिच्या दोन डावात १५९ रन्स केल्यामुळे प्लेअर ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले. तिने भारतासाठी जून २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध  WODI मध्ये पदार्पण केले. द हंड्रेडच्या पहिल्या सीझनसाठी तिला बर्मिगहॅम फिनिक्सने साइन केले होते. ती २०२२ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या रौप्य-पदक मिळवणाऱ्या टीमचा भाग होती. काही महिन्यांनंतर, तिने बांगलादेशमध्ये आशिया कप जिंकण्यात भारताला मदत केली. २०२३ या वर्षांच्या सुरुवातीच्या काळात, तिने भारतीय अन्डर १९ संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषक ट्रॉफीसाठी केले. जे भारतीय राष्ट्रीय महिला संघासाठी पहिले आयसीसी सिल्व्हरवेअर होते. आता ती पहिल्या महिला प्रीमियर लीगसाठी दिल्ली कॅपिटल्स या संघात सामील झाली आहे.

एवढे रेकॉर्डस असणारी शफाली सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानते. तिच्या खेळण्यातला आक्रमकपणा हा विरेन्द्र सेहवागची आठवण करून देणारा आहे. तिचं आंतरराष्ट्रीय बॅटिंग रॅंकिंग १६ आहे आणि आंतरराष्ट्रीय बॉलिंग रँकिंग १९४ आहे. आतापर्यंत तिने १,६०५ रन्स केले आहेत. भारतीय महिला क्रिकेटचे नाव उंचवू शकेल अशी खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.

viva@expressindia.com