राजकारणातली यंग ब्रिगेड आणि सेलिब्रिटीज यांना समाजसेवेत सक्रिय सहभागी व्हायचं असतं, पण म्हणून त्यांना गबाळं राहायलाही आवडत नाही. राजकारण म्हणजे सफेद कुर्ता आणि पायजमा या रटाळ समीकरणाच्या पुढे पाहायला ते आसुसलेले असतात. केवळ उमेदवारच नाही तर प्रचाराची धुरा अंगावर असलेले कार्यकर्ते, थिंक टँक, समर्थक या सगळ्यांमधून सध्या केवळ पॉलिटिकल स्टाइल दिसत आहे. निवडणुकीनिमित्त होणाऱ्या सभा, चर्चासत्रं, वादविवाद येथे सामील होऊन तुम्हालाही जरा भाव खायचा असेल तर राजकारणावर अभ्यास हवा, तसा थोडा पॉलिटल फॅशनचा अंदाजही हवा. या राजकीय रणधुमाळीत कोणत्या ना कोणत्या निमित्तानं ‘स्टाइल’मध्ये सहभागी व्हायचं असेल तर अशा काही फॅशन टिप्स..

टिप्स :
खादी खादी आणि फक्त खादी. राजकारणात खादी मस्ट आहे. जर खादी तुम्हाला बोर वाटत असेल तर थिंक अगेन. खादी फॅब्रिक्समधला रस्टिक लूक या सीझनमध्ये भाव खाऊन जातो.

साडी आणि राजकारण यांचा संबंध खूप जुना आहे. त्यातून सध्या उन्हाळा. या सीझनमध्ये कॉटनच्या साडय़ा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. या साडय़ांना हलकी सोनेरी झालर फिरवू शकता.

स्ट्रेट फिटचे कपडे तुम्ही ट्राय करू शकता. कुर्तीज, लाँग शर्ट्सचा वापर करू शकता.

या काळात वातावरण गंभीर असतं. रंगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रे, ब्राऊन, मरून, नेव्ही या अर्दी टोनसोबतच, क्रिम, लाइट निळा, गुलाबी या पेस्टल शेड्स या सीझनचे हिट रंग आहेत. सफेद रंगाचा वापर बिनधास्त करू शकता.

जॉमेट्रिक प्रिंट्स या काळात प्राधान्याने वापरावेत. बाटिक, बांधणी, लेहरिया अशा खास इंडियन टचच्या प्रिंट्सचा वापर कराच.
viva.loksatta@gmail.com