कलर ऑफ द इअर
मागच्या पुरवणीतील (दि. ९ जानेवारी) ‘कलर ऑफ द इअर’विषयी भक्ती तांबेने लिहिलेला लेख आवडला. मार्सला हा खूपच युनिक कलर आहे. खूपच मस्त रंग. माझ्याकडे या रंगछटेमधल्या काही गोष्टी आहेत, याचा मला आनंद आहे. जाता जाता एक इनपुट.. काही नेल पॉलिश पॉप्समधली २१ नंबरची शेड मार्सला आहे. मार्सला शेडमधली आणखी प्रॉडक्ट्सची शोधणार.     – गायत्री गुजराथी

ग्रूपमधल्या ‘सेलिब्रिटी’ स्टेट्ससाठी
vv26‘०२:०० एम’चा अश्वत्थामा हा ९ जानेवारी २०१५ च्या व्हिवा पुरवणीमधील लेख वाचला. टीनएजर्स आणि तरुण यांच्या मनाचा शोध घेण्याचा उत्तम रीतीने प्रयत्न केलाय. मला एक गोष्ट सांगाविशी वाटतेय की, २ एम गर्ल्स-बॉइज रात्री २ पर्यंतच नाही तर प्रत्येक क्षणाला स्वत:ला प्रेझेंट करीत असतात. आपली कुणी तरी दखल घ्यावी, हा प्रयत्न असतो. सगळीकडे पब्लिसिटीचे वारे वाहत असताना, सेलिब्रिटी नावाचं भलं मोठं आकर्षण निर्माण होतं. ही २ एएमर्स मग स्वत:च्या ग्रूपमध्ये का होईना स्वत:ला सेलिब्रिटी बनवू पाहत आहेत. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेताहेत.
स्नेहा नलिनी श्रीकृष्ण भोयर, पुणे</strong>

प्रतिक्रिया पाठवा
व्हिवा पुरवणीतील लेखांविषयी आपली मतं, प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरुर पोचवा. तुमची पत्र तुमच्या फोटोसह viva@expressindia.com ÎIaY½FF viva.loksatta @gmail.com या इ मेल वर पाठवा.