नवीन वर्षांचा दुसरा आठवडा आता सरला. नव्या वर्षांच्या नव्या संकल्पांचं भवितव्य एव्हाना उमगलेलं असेल. आपल्यातल्या बहुतेकांनी आळसनामक शत्रूपुढे हाराकिरी केली असेल. नवीन वर्षांच्या स्वागताच्या जय्यत तयारीत नवीन वर्षांचे संकल्प हमखास केले जातात. यंदाचा संकल्प कोणता, ते शिस्तीत सोशलसाइट्सवर अपडेट केलं जातं. स्टेटस म्हणून ठेवलं जातं. या संकल्पांची-रेझोल्युशनचीही एक गंमत असते. काहींचे संकल्प थर्टी फर्स्टच्या सेलेब्रेशनमध्येच हरवून जातात. काहींचे नव्याचे चार दिवस म्हणून आठवडा-पंधवडाभर टिकतात. काहींचे संकल्प क्षणाक्षणाला बदलत राहतात.. मे बी अपडेट होतात.. पण काही जण मात्र आपापले संकल्प पूर्ण करायचेच, असा ठाम निश्चय करतात नि तसं वागतातही. त्यांच्यापासून आपण थोडीशी प्रेरणा घ्यायला हवी.
 त्याच त्या रुळलेल्या वाटांवर न चालता थोडय़ा वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या आपल्या मित्रमंडळींपकी काही जणांनी त्यांचे नवीन वर्षांचे नवे संकल्प आपल्याशी शेअर केल्येत.

ऋषीकेश राऊत
पोस्ट ग्रॅज्युएशन इन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम, गरवारे इन्स्टिटय़ूट
मला एक्स्प्लोअर करायंचय. फ्रेण्ड्स नि आईबाबांसोबत चिक्कार फिरायचंय. यंदा अभ्यासामुळं मी क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकलेलो नाहीये, तो पुढील वर्षी द्यायचं मनात आहे.

समीर पटवर्धन
फर्स्ट ईयर, चेतनाज सेल्फ फायनािन्सग कोर्स, चेतना कॉलेज
पक्षीनिरीक्षणाची आवड असल्यामुळं त्या संदर्भात माहिती देणाऱ्या पुस्तकांचं वाचन मला करायचं आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करून स्त्रियांना मदत करण्यात आमच्या ग्रुपला खारीचा वाटा उचलायचा आहे. त्या अनुषंगानं काय करता येईल, हा विचार चालू आहे.

मृण्मयी काळे
एम.एस.सी. इन्स्टिटय़ूशन ऑफ फॉरेन्सिक सायन्स
शस्त्रास्त्र नि त्यांचा वापर हा माझ्या अभ्यासविषय आहे. अश्मयुगापासून ते आजच्या अत्याधुनिक काळापर्यंत वापरल्या गेलेल्या शस्त्रांची नि त्यांच्या तत्कालीन उपयुक्ततेची अधिकाधिक माहिती मला जमा करायची आहे.

डॉ. भाग्यश्री गांधी
फिजिओथेरपिस्ट
मी फिजिओथेरपिस्ट असल्यानं पेशंटना चांगली सíव्हस पुरवण्याचं ध्येय कायम माझ्या डोळ्यांसमोर असतं. शिवाय मेडिकल फिल्डमधील, नवीन शोध नि सोयी-सुविधांबद्दल सतत अपडेट राहून, ते आत्मसात करून पेशंटना लवकर बरं करण्याचा माझा संकल्प आहे.

प्राची बापट
रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वरळी
माझा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मला फ्रीलान्सर म्हणून काम करायचं आहे. शिवाय या अभ्यासक्रमानंतर कॉपी रायटिंगमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे.

विराज खानोलकर
बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन
मी बेसबॉल प्लेअर आहे. गेली दोन वर्षांपासून हरणाऱ्या आमच्या टीमला आता जिंकून द्यायचंय. माझ्या खेळात अधिक सुधारणा करीत प्रॅक्टिसला अधिक वेळ द्यायचाय. यंदा मी पदवीधर झाल्यावर बेसबॉलची महती नि महत्त्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना या खेळाची गोडी लावायची आहे.

निनाद भागवत
सिव्हिल, बी. आर. कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
मला विविध विषयांच्या वर्कशॉप्समध्ये सहभागी व्हायचंय. जिऑलॉजीसारख्या माझ्या आवडत्या विषयासंबंधी शक्य तेवढी सखोल माहिती गोळा करायची आहे. किमान तीन मोठय़ा ट्रेकना जायचंय. रोजच्या खर्चाचा हिशेब लिहून त्याचा वेळोवेळी आढावा घ्यायचाय.

निरंजन नेने
त्वेर स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमी, रशिया
सध्या मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारेय. अ‍ॅनॉटॉमी, फिजिऑलॉजी इत्यादी विषयांतील सखोल माहिती मला जाणून घ्यायची आहे. मी रशियन भाषा बोलू, लिहू, वाचू शकत असलो, तरी त्यात मला अधिकाधिक प्रगती साधायची आहे. फिटनेससाठी नियमितपणे व्यायाम करण्याचाही संकल्प केलाय.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.