शब्दांकन: श्रुती कदम
होगा यह दसवां अवतार विष्णु का अति भयंकर अति विकराल रूप विष्णु का आएंगे कल्कि बन के संतों का अभिमान आएंगे कल्कि बन के करने पापियों का सर्वनाश




‘कुकू एफएम’वर प्रसारित होणाऱ्या ‘द वॉरियर ऑफ कलयुग’ या पॉडकास्टमध्ये भविष्यात होणाऱ्या कल्की अवताराच्या कथा सांगितल्या जातात. या कथा संयम शर्मा आणि नीरज यादव हे दोन आरजे मिळून सादर करतात. महाभारताप्रमाणे यातही अनंत आणि शेष या दोघांमधील संवाद आहे. रथातून प्रवास करत असताना अनंत शेषला कल्की अवताराबद्दल प्रश्न विचारत जातो आणि शेष त्याच्या प्रश्नांचे निरसन करतो. यातील ‘कल्की जन्म’ या सातव्या भागात या अवतारात कशा प्रकारे कल्कीचा जन्म झाला आणि सात चिरंजीवींनी एकत्र येऊन कल्की हे नाव ठेवलं याची कथा सांगितली जाते. हा भाग संपताना शेष ‘होगा यह दसवां अवतार विष्णु का, अति भयंकर अति विकराल रूप विष्णु का, आएंगे कल्कि बन के संतों का अभिमान, आएंगे कल्कि बन के करनें पापियों का सर्वनाश’ या पंक्ती ऐकवतो आणि सात चिरंजीवी हे कल्की युद्धापर्यंत या पृथ्वीवरच राहत असल्याचे रहस्य सांगतो.
हेही वाचा >>> ऐकू आनंदे
सध्या संपूर्ण भारतात कलियुग आणि कल्की अवताराबद्दल खूप जास्त चर्चा होताना दिसते. आमच्या कॉलेजमध्ये आणि घरातदेखील याविषयी चर्चा सुरू असते. त्यामुळे उत्सुकतेपोटी मीदेखील कलियुग आणि कल्की यांच्याबद्दलची माहिती वाचायला, व्हिडीओ बघायला सुरुवात केली. त्या वेळी मला ‘द वॉरियर ऑफ कलयुग’ हा पॉडकास्ट दिसला. या पॉडकास्टमध्ये कल्की जन्मापासून ते कल्की विवाह आणि अंतिम युद्धापर्यंतच्या गोष्टी मांडल्या आहेत. पण मला यातला ‘कल्की जन्म’ हा भाग खास आवडला. कल्की हा एक असा विषय आहे जो खरंच घडणार आहे का? याबद्दल कोणालाच कल्पना नाही आणि तरीही एक दिवस कल्कीचा जन्म होईल यावर लोकांचा विश्वास आहे. मी फार धार्मिक नाही, पण जर ही कथा काल्पनिक असेल तरी याची मांडणी खूप उत्तम प्रकारे करण्यात आली आहे, त्यामुळे मला ही कथा आवडते. – तनया राणे (विद्यार्थी)