हिवाळा आणि फॅशनचे चाहते यांचे नाते फार जुने आणि सर्वज्ञात आहे. हिवाळा आला की कापडाचे एकावर एक लेअर्स असलेले ‘लो हेमलाइन’ ड्रेस असायलाच हवेत. थंडीच्या दिवसातली ‘फॅशन’ जर योग्य प्रकारे केली तर येणारा लूक हॉट असू शकतो.
थंडीचे दिवस फॅशन फ्रीक मुलींसाठी अगदी चैनीचे असतात. कधी या मुलीथंडीच्या मौसमावर खूश असतात तर कधी चिडचिड करतात, पण तरीही थंडीत फॅशन केल्याशिवाय मात्र राहू शकत नाहीत. अर्थात तुमच्या थंडीसाठीच्या कलेक्शनमध्ये, तुम्ही कुठे राहता यानुसार बदल संभवतात. उदाहरणार्थ पुणे, नाशिक, नागपूर सारख्या ठिकाणी राहात असाल तर तुमच्याजवळ भरपूर थर असलेले जाडजूड कपडे असायला हवेत, पण मुंबईच्या थंडीला पातळ थर असलेले कपडे पुरेसे होतील.
स्कल कॅप्स/बीनीज/मफलर्स/स्कार्फ/ग्लोव्हज हे सगळे थंडीसाठीच्या कपडय़ांच्या जोडीने घालायचे ‘अॅक्सेसरीज’. तुमच्या जवळ यांतील काहीतरी असायलाच हवे. जर तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहात असाल तर मस्त रंगातला, छानसं िपट्र असलेला स्कार्फ पुरेसा होईल. चमको रंगातला सिल्कचा स्कार्फ तुमच्या थंडीच्या कपडय़ांना एकदम ‘झँग’ गेटअप देईल. शिवाय डोक्याभोवती गुंडाळण्याचा सुंदर गोंडेदार टोपीसारखी ‘बीनी’ खास ख्रिसमस टाइमसाठी पार्टीजमधून वापरता येईल.थोडक्यात काय अॅक्सेसरीज थोडय़ाशा विचित्र आणि मजेदार असायला हव्यात.
आता आपण सध्या वापरात असलेल्या (उन्हाळा किंवा पावसाळ्यात वापरले जाणारे) आपल्या कपडय़ांचा उपयोग थंडीच्या दिवसांत कसा करता येईल ते पाहूया.
‘शॉर्टस’ थंडीच्या दिवसात वापरता येत नाहीत. असं वाटतंय तुम्हाला? मग तो गरसमज आहे. ‘शॉर्टस’ खाली गडद रंगाचे (प्लेन/पॅटर्नड) लांब मोजे (स्टॉकिंग्ज) घातल्यावर बायकर जाकीट घाला, आणि थंडीसाठी क्षणात तयार व्हा. व्हेरी सिम्पल.
आणखी एक, शर्टच्या आत अन्य एखादा कपडा घालता येईल. मुंबईसारख्या शहरात, थंडीच्या ऋतूतही फार थंडी जाणवत नाही, पण अती थंडीच्या काही मोजक्या दिवसांत ही जादुई युक्ती कामास येईल आणि तुमचा लुकही वेगळाच दिसेल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्याच्या ऋतूत कपडय़ांमध्ये उदास, मळकट रंगसंगती वापरावी असे मुळीच नाही. आजकाल उठावदार, चमकदार, पिवळा, निळा, लाल रंग जास्त वापरात आहेत. तुम्हाला कोणतेच रंग नको असतील तर ‘फॅशन’ म्हणून नखशिखांत पांढरे कपडे घाला. कपडय़ावरील िपट्रस मात्र, या मौसमासाठी ठळक आणि मोठे हवेत.
या मौसमात तुम्हाला फुलांचे िपट्र असलेले कपडे हवे असतील तर गडद रंगसंगतीचे समर िपट्रस निवडा. सध्या विशेषत: या थंडीच्या दिवसांत गडद फुलाफुलांच्या िपट्रस ‘इन’ आहेत. बॉलीवूडमधल्या तारकाही तेच वापरताना दिसतात. हिवाळ्याचा ऋतू हा मॅक्सी ड्रेस, स्कर्ट्स, मिडीज वगरे कपडे घालण्यासाठी उत्तम. या कपडय़ाच्या विशिष्ट लांबीमुळे, थोडेसे अंग उघडे राहते; पण बऱ्यापकी अंग झाकलेही जाते आणि तुमचा लुक ‘हॉट’ व्हायला मदत होते.
वजनाला हलकी, पातळ प्रिंटेड जाकिटे वापरायला चांगली. ‘केप’सारखी अंगावर घेतली तरी चालण्यासारखे. यातून थंडीची नवीन ‘फॅशन’ निर्माण होईल.
या प्रसन्न, आल्हाददायक थंडीच्या ऋतूत पोक्त, वयस्क दिसायला मज्जाव आहे. तेव्हा उबदार आणि आरामदायी कपडे वापरा. आणि हो.. जसजशी थंडी वाढेल तसे फॅशन करायला विसरू नका. हा हिवाळा तुमच्यासाठी आनंदाचा असू दे.
अनुवाद : गीता सोनी
या हिवाळ्यासाठी आपल्या कपाटात असायलाच हव्यात अशा ‘मस्ट’ गोष्टी
केप्स
गेल्या वर्षी ‘केप’ची जुनीच ‘फॅशन’ नव्याने लोकप्रिय झाली आणि आता या गारठय़ाच्या दिवसातही त्याची ‘स्टाइल’ टिकून राहील हे नक्की. या पेहेरावाचा फायदा म्हणजे तुम्हाला ‘फेमिनाइन’ लुक मिळतो आणि शाल अंगावर घेतल्यानंतर येणारा शानदार आब ही दिसतो. शिवाय हा कपडा व्यवस्थित बेतून शिवलेला असल्याने घालायलाही शालीपेक्षा सुकर होतो. उबदार ‘फिटेड’ जीन्स आणि बूटसवर ‘केप’ पांघरा आणि याचा एकत्रित परिणाम अनुभवा.
बूटस
थंडीत घालायच्या पादत्राणांमध्ये ‘बूट’ हवेतच. त्यात तुमचे व्यक्तिमत्त्व उठावदार दिसतेच, पण तुम्हाला ऊब आणि आरामही मिळतो.
लेदर क्विल्टेड जॅकेट
तुम्ही प्राणीमित्र (‘पिटा’चे समर्थक) असाल तर कृत्रिम चामडय़ाचे जाकीट वापरता येईल. यामुळे थंडीपासून पुरेसा बचावही होईल आणि पुन्हा तुम्ही स्टायलिशही दिसाल. एक गोष्ट लक्षात घ्या, चामडय़ाची वस्त्रप्रावरणे, आपण फक्त या थंडीच्या दिवसातच घालू शकतो तेव्हा ‘डू जस्टीस टू इट.’
उबदार लेगिंग्ज
वर्षभर कपडय़ाच्या फॅशनमध्ये ‘इन’ असणाऱ्या ‘लेगिंग्ज’ हा पायजम्याचा प्रकार तुम्ही थंडीसाठी निवडू शकता. यांतील स्वेट मटेरीअलचे अस्तर असणारे ‘लेगिंग्ज’ तुमच्या पायांना ऊब तर देतीलच शिवाय तुम्हाला ‘स्टायलिश लुक’ही देतील.