विडी विक्री व कच्च्या तंबाखूवरील व्हॅट कर रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य विडी कामगार फेडरेशनच्या शिष्टमंडळास मुंबई येथे दिले. शिष्टमंडळाने पवार यांना विडी उद्योगापुढील अडचणींचे निवेदनही दिले.
व्हॅट करामुळे विडी विक्रीवर परिणाम होऊन राज्यातील हजारो कामगारांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. विडी कामगारात ९० टक्के महिला व आर्थिक दुर्बल घटकही आहेत. केंद्र सरकारप्रमाणे १ हजार विडीमागे १० रुपये व्हॅट अकारावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. मधुकर पिचड उपस्थित होते.
श्ष्टिमंडळात कॉ. कारभारी उगले, शांताराम वाळूंज, रमेश नागवडे, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, निवृत्ती दातीर, बापू नागवडे, शंकर न्यालपेल्ली आदींचा समावेश होता.