लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कार्यकर्त्यांमध्येही त्यामुळे उत्साह संचारू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या उरण तालुक्यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांची उद्घाटने सुरू झाली आहेत. यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचेदेखील प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. या रणधुमाळीत वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकत्रे कामाला लागलेले असून प्रचार कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची भाऊगर्दी जमत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उरणमध्ये प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनांचा धडाका
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कार्यकर्त्यांमध्येही त्यामुळे उत्साह संचारू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या उरण तालुक्यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांची उद्घाटने सुरू झाली आहेत.
First published on: 27-03-2014 at 08:48 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition of inauguration of election offices in maval constituency