केंद्र सरकारच्या देशातील अकरा प्रमुख बंदरांचे महामंडळ करण्याच्या निर्णयाला जेएनपीटी बंदरातील सर्व कामगार संघटनांचा तसेच असोसिएशनचा विरोध असल्याने बंदरातील कामगारांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या जेएनपीटी कॉपरेरेशन विरोधी संयुक्त कृती समितीने सोमवारी दुपारी साडेतीन वाजता जेएनपीटी प्रशासन भवनासमोर जोरदार निदर्शने केली.
जेएनपीटीचे कामगार विश्वस्त भूषण पाटील व दिनेश पाटील यांच्या नेतृत्वात जेएनपीटीमधील न्हावा शेवा बंदर कामगार संघटना(अंतर्गत), जेएनपीटी एकता कामगार संघटना, न्हावा शेवा पोर्ट अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियन, जेएनपीटी वर्कर्स युनियन, जेएनपीटी एम्प्लॉइज व जनरल कामगार युनियन, जेएनपीटी एससी, एसटी, ओबीसी वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र संघटित व असंघटित कामगार सभा, जेएनपीटी एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन व स्थानीय लोकाधिकार समिती या संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.