एज्युकॉम्प स्मार्टस्कूल अंतर्गत देशभरातील शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ‘एज्युकॉम्प स्मार्टक्लास’ने ठरविले आहे.  एज्युकॉम्प स्मार्टस्कूल (ईएसएस) हा नव्या पिढीचा उपक्रम सुरू करण्यात आला असून यात शाळांना पाचस्तरीय तंत्रज्ञान पुरविले जाणार आहे.
स्मार्टक्लासची ओळख करून देण्यासाठी शहरातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. एज्युकॉम्प स्मार्टस्कूलसह आम्ही शाळांकडे सर्वसमावेशक शिक्षणाची इको-सिस्टीम म्हणून पाहतो. स्मार्टक्लासमध्ये शिफारस करण्यात आलेल्या पाठय़क्रम योजनेनुसार विद्यार्थी आमच्या सवरेत्कृष्ट दर्जाच्या ३ डी अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून शिकविण्यात येणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आल्याचा अनुभव घेऊ शकतील, असे एज्युकॉम्प स्मार्टक्लासचे पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन सिन्हा कार्यशाळेत बोलताना म्हणाले. एज्युकॉम्पच्यावतीने ओकांरनगरातील मेघे ग्रुप ऑफ स्कूल्स, अत्रे लेआऊट व भारतीय विद्या मंदिरचा सत्कार करण्यात आला.