News Flash

अजित पवार यांचा उद्या बीडला सत्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. १६) परळीत येणार असून, येथे त्यांचा जाहीर सत्कार आयोजित केल्याची माहिती आमदार धनंजय मुंडे यांनी दिली.

| September 15, 2013 01:55 am

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. १६) परळीत येणार असून, येथे त्यांचा जाहीर सत्कार आयोजित केल्याची माहिती आमदार धनंजय मुंडे यांनी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्यासह १५ आमदार या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक आमदार मुंडे यांनी दिली. परळी शहरातील पाणीयोजना, रस्ते, नाल्या व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी कोटय़वधीचा निधी अजित पवार यांनी मंजूर केला. या बरोबरच आपणास विधान परिषद सदस्यत्वाची संधी दिली याबद्दल आभार मानण्यासाठी या सत्काराचे आयोजन केल्याचे आमदार मुंडे यांनी सांगितले. सोहळ्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बठक घेऊन विविध समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:55 am

Web Title: honour of ajit pawar in bid tomorrow
Next Stories
1 गॅसवरील अनुदानाची रक्कम १ ऑक्टोबरपासून खात्यात
2 वर्गणीवरून २ गटांत हाणामारी; तीन जखमी
3 ग्रंथमित्र पुरस्काराने पिंपळकर सन्मानित
Just Now!
X