08 August 2020

News Flash

श्रीरामपूरला रेल्वेमार्गाजवळील अतिक्रमणे हटवली

रेल्वे प्रशासनाने आज लक्ष्मी चित्रपटगृहासमोर असलेली अतिक्रमणे काढून टाकली. त्यामुळे अनेक व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली. अतिक्रमणे काढताना पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात असल्याने

| November 29, 2012 02:24 am

रेल्वे प्रशासनाने आज लक्ष्मी चित्रपटगृहासमोर असलेली अतिक्रमणे काढून टाकली. त्यामुळे अनेक व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली. अतिक्रमणे काढताना पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात असल्याने दुकानदार विरोध करू शकले नाही.
रेल्वेमार्गाच्या कडेला सय्यदबाबा दर्गा ते लक्ष्मीनारायण मार्केट दरम्यान व्यावसायिकांची दुकाने आहेत. यापूर्वी २००१ साली ही अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न रेल्वेने केला होता. परंतु माजी आमदार भानुदास मुरकुटे व रंजना पाटील यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री नितिशकुमार यांची भेट घेऊन कारवाई थांबविली होती. त्यानंतर दुकानदार न्यायालयात गेले. न्यायालयात रेल्वेच्या बाजूने निकाल झाला. आज रेल्वेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
नुरमोहंमद जहागीरदार, अन्वर मन्सुरी, शौकत मन्सुरी, मोहम्मद इक्बाल शेख, अबरार शेख, नजिम शेख, इम्रान शेख, हौसाबाई जावळे, वसंत िशदे, नजिम शेख, चंद्रकांत घाडगे, विठ्ठल क्षीरसागर, सलिम सय्यद, मनोज पवार, रिवद्र शेरकर, माजीद सय्यद, शांताराम मावरे, राजेंद्र भोसले, अमृतसिंग िधग्रा, अलिराजा शेख, शंकर तेरके, हसन शेख, सरदार तांबोळी, अरूण बनसोडे आदी व्यावसायिकांचे या कारवाईत मोठे नुकसान झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2012 2:24 am

Web Title: illigal structure distroyed in shrirampur railway track
टॅग Railway,Shrirampur
Next Stories
1 कोल्हे गटाला ४ तर काळेंना २ ग्रामपंचायती
2 कामगार-व्यवस्थापनाच्या संघर्षांत सायझिंग उद्योगाला घरघर
3 पालघर फेसबुक प्रकरणी शिवसेनेची निदर्शने
Just Now!
X