आतापर्यंत केवळ परदेशात चालविला जाणारा ‘मास्टर इन पब्लिक पॉलिसी’ हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठातही सुरू करण्यात आला आहे. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम राबविण्यात येईल. हा अभ्यासक्रम तयार करण्यात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याच उपस्थितीत हा अभ्यासक्रम सुरू होत असल्याचे जाहीर करण्यात आले. समाजातील बदलांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमांमध्ये उमटणे आवश्यक आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या आणि माध्यम क्रांतीमुळे समाजात मोठय़ा प्रमाणावर बदल होत आहेत. या सर्व बदलांची दखल घेऊन अभ्यासक्रमात बदल होणे आवश्यक आहे, असे मत क्षत्रिय यांनी मांडले. या प्रकारचा अभ्यासक्रम परदेशातील जागतिक किर्तीच्या विद्यापीठांमध्ये शिकविला जातो. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून कुठल्याही शाखेचा पदवीधर यासाठी प्रवेश घेऊ शकेल. या अभ्यासक्रमासाठीचे वर्ग सायंकाळी चालविण्यात येणार आहे. म्हणजे नोकदरांनाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’