ज्येष्ठ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक दिवंगत पं. सी. आर. व्यास यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र ललित कला निधीतर्फे ६ नोव्हेंबर रोजी ‘संस्मरण’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पं. सी. आर. व्यास यांच्या षष्टय़ब्दीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे यांनी पं. व्यास यांच्याविषयी भाषण केले होते. ‘संस्मरण’ या कार्यक्रमात पुलंनी केलेले ते भाषण ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
१९८४ मध्ये पं. सी. आर. व्यास यांच्या षष्टय़ब्दीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पु. ल. देशपांडे उपस्थित होते. पुलंनी केलेल्या भाषणाची ध्वनिचित्रफीत या वेळी दाखविण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध तालयोगी, ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर आणि शास्त्रीय गायक सुहास व्यास हे दोघे जण ताल आणि गाण्यातून पं. व्यास यांचा संगीत प्रवास उलगडणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे सायंकाळी ७.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात पं. सी. आर. व्यास यांचे शिष्य आणि गायक पं. संजीव चिमलगी यांच्या गायनाने होणार आहे. ज्येष्ठ संतुरवादक पं. सतीश व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ललित कला निधीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर रसिकांना कार्यक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी