कामोठे वसाहतीमधील सेक्टर- १२ येथे राहणाऱ्या प्रियंका गुप्ता हिचे अपहरण नव्हे तर ती बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यासाठी पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तीन पथके तिचा तपास करीत आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडलेली प्रियंका त्याच रात्री साडेनऊ वाजता मनमोहन मिठाईवाला चौकात एका तीन आसनी रिक्षाचालकाला दिसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. त्यामुळे प्रियंकाचे अपहरण झाले नसून ती बेपत्ता झाल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी प्रियंकाचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यामुळे त्या छायाचित्रावरून प्रियंका ही मिठाईवाला चौकात असल्याची माहिती रिक्षाचालक तेजस गोवारी याने पोलिसांना दिली. कामोठे ग्रामपंचायतीने कामोठे वसाहतीमधील मुख्य चौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळा येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2015 रोजी प्रकाशित
प्रियंका गुप्ता बालिकेचे अपहरण नव्हे तर बेपत्ता
कामोठे वसाहतीमधील सेक्टर- १२ येथे राहणाऱ्या प्रियंका गुप्ता हिचे अपहरण नव्हे तर ती बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
First published on: 07-07-2015 at 07:12 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gupta is missing not kidnap