News Flash

लाचखोर अभियंता खाडेच्या मालमत्तेची मोजदाद सुरूच

कंत्राटदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक झालेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता गजानन खाडे याच्या संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच आहे.

| September 21, 2013 01:53 am

कंत्राटदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक झालेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता गजानन खाडे याच्या संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच आहे. दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती बाळगून असणाऱ्या खाडेच्या स्थावर व जंगम मालमत्तेची मोजणी करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्यांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. बेहिशेबी मालमत्तेची तपासणी अजूनही सुरूच असल्याने खाडेचे पायदेखील चिखलीकरएवढेच भ्रष्टाचाराच्या दलदलीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खाडे याची विविध बँकांमधील खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू असून बांधकाम विभागाने त्याच्या निलंबनाबाबतही कारवाई सुरू केली. उस्मानपुरा येथील संजय हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या खाडे याच्या घराची झडती घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत त्याची संपत्ती १० कोटी रुपये आहे, असे सांगितले जात होते. आजही त्याच्या संपत्तीची मोजदाद सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2013 1:53 am

Web Title: property counting continue of corrupt engineer khade
Next Stories
1 सोयाबीन भाव घसरल्याने लातूरला ३ हजार कोटींचा फटका- पटेल
2 नुकसान कमी दाखविण्याचा दबाव; तक्रारी आल्यास निलंबनाची तलवार!
3 मरडसगाव विद्यार्थ्यांचे बससाठी ‘रास्ता रोको’
Just Now!
X