जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून कामासाठी हातावर पोट असलेला शेतातील कष्टकरी वर्ग गावाबाहेर पडत आहे. मजुरांचे हे स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्य़ात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने औंढय़ाचे तालुकाप्रमुख अंकुश आहेर यांनी केली.
जिल्ह्य़ात दुष्काळी तीव्रता अधिक असून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध नाही. मजुरांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. जिल्ह्य़ातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच पाणंद रस्ते, सिंचन विहिरी, शेततळे यासारखी कामे रोहयोंतर्गत सुरू करून मजुरांचे स्थलांतर थांबविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यातआली.