प्लॉट अस्तित्वात नसताना त्याचा बनावट उतारा तयार करून त्या आधारे प्लॉट १२ लाखांस विकला आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शहराजवळील तळे हिप्परगा गावच्या ग्रामसेवकासह सात जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात, सुनंदा चक्रवीर महिंद्रकर (वय ४३, रा. रेणुकानगर, विडी घरकुल, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तळे हिप्परगा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका बंदपट्टे यांच्यासह अमोल औदुंबर तांबे, रागिणी अमोल तांबे, आशाबाई औदुंबर तांबे, अनिल औदुंबर तांबे, बालाजी यल्लप्पा पवार (सर्व रा. तळे हिप्परगा) व सत्यनारायण अंबाजी सोमा (रा. जुना बोरामणी नाका, सोलापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तळे हिप्परगा येथे सिद्धेश्वर हाउसिंग सोसायटीत प्लॉट क्र. २७ अस्तित्वात नसताना ग्रामसेविका बंदपट्टे यांच्या मदतीने त्याचा बनानट उतारा तयार करून त्या आधारे तांबे कुटुंबीयांनी प्लॉटचा सौदा केला. सुनंदा महिंद्रकर यांना हा अस्तित्वात नसलेला प्लॉट १२ लाखांस विकून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे आढळून आले.