News Flash

राज्यप्राणी ‘शेकरू’विषयी सर्व काही पुस्तकात!

महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या ‘शेकरू’विषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती आणि त्याच्या जतन व संवर्धनासाठी शेकरूविषयक सविस्तर माहिती

| January 11, 2014 01:35 am

महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या ‘शेकरू’विषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती आणि त्याच्या जतन व संवर्धनासाठी शेकरूविषयक सविस्तर माहिती असलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. राज्य शासनाच्या कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव आणि प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक डॉ. रेने बोर्जीस यांनी त्याचे लेखन केले आहे.
शेकरू हा प्राणी ‘खार’ प्राणिगटात येतो. मात्र विविध प्रदेशांनुसार त्याच्या रंगात फरक पडतो. शेकरूची राहण्याची ठिकाणे, त्याची आवडती झाडे, त्याची शरीररचना, त्याचे खाद्य, त्याच्या रंगावर होणारे परिणाम, महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात शेकरूचे आढळणारे विविध प्रकार आदी बरीच माहिती पुस्तकातआहे. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे शेकरू या प्राण्याची ‘लाइन ट्रान्सेक्ट’ पद्धतीने मोजणी करताना मिळालेले नकाशे यात देण्यात आले आहेत.  शेकरू लाजाळू प्राणी म्हणून ओळखला जातो. भीमाशंकर तसेच पश्चिम घाट परिसरातही शेकरू मोठय़ा संख्येने आढळून येतात. भीमाशंकर येथे दरवर्षी शेकरूंची गणना केली जाते. इतर प्राण्यांसारखे शेकरू एकाच घरटय़ात न राहता ते वेगवेगळ्या झाडांवर घरटे बांधून राहतात.अधिक माहितीसाठी संपर्क एम.के. राव (०२३१-२६५३६३२).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 1:35 am

Web Title: shekru in text book
Next Stories
1 चिऊताईचे घरटे!
2 आज सहावा झी २४ तास अनन्य सन्मान सोहळा
3 ‘सारेगमप’च्या स्पर्धकांचा ताल जोखणार जगप्रसिध्द तालवादक तौफिक कुरेशी
Just Now!
X