01 October 2020

News Flash

विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी- जोगळेकर

विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. त्यांनी ‘संगीत कल्पतरू’ या ग्रंथाचे संपादन केले त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे आग्रही विचार अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात, यातच त्यांचे अलौकिकत्व स्पष्ट

| June 25, 2013 01:28 am

विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. त्यांनी ‘संगीत कल्पतरू’ या ग्रंथाचे संपादन केले, तसेच सुमारे एक हजार गीतांची रचना केली. त्यांचे विश्वव्यापी कार्य, हिंदुत्वाबद्दलचे आग्रही विचार व हे सर्व अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात, यातच त्यांचे अलौकिकत्व स्पष्ट होते, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार व स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती-महाराष्ट्रचे प्रदेश कार्यवाह सुधीर जोगळेकर यांनी काढले.
‘स्व’विकास केंद्रातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ‘स्व’विकास दिनदर्शिका २०१३-१४’च्या प्रकाशनप्रसंगी जोगळेकर बोलत होते. जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोप समितीचे सदस्य आर. सी. बाफना, नगरसेविका साधना सुरडकर या वेळी उपस्थित होते. आपल्याला इतरांपासून तोंड लपवावे लागेल, असे काम आपल्या हातून घडू नये, तसेच आपले पोट भरण्यासाठी इतर कोणाचा जीव घेऊ नये, असे सांगत आर. सी. बाफना यांनी शाकाहार व शुद्ध चारित्र्य याचे महत्त्व विशद केले. ‘स्व’विकास केंद्राचे संचालक श्रीकांत काशीकर यांनी प्रास्ताविक केले. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रातर्फे या वेळी करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2013 1:28 am

Web Title: vivekanandas personality versatile joglekar
टॅग Aurangabad
Next Stories
1 वीस हजार फार्मासिस्ट रुग्णांना सेवा देणार
2 रेनवॉटर हार्वेस्टिंगप्रश्नी मनसेतर्फे उद्या निदर्शने
3 औषध दुकाने उद्यापासून सकाळी बंद, दुपारी चालू
Just Now!
X