12 July 2020

News Flash

‘पंचगंगा’ प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार असून त्यासाठी २८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ही महत्त्वपूर्ण

| February 25, 2014 04:00 am

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार असून त्यासाठी २८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ही महत्त्वपूर्ण तरतूद असणार आहे. विकासकामांचा धडाका उडवून देणाऱ्या अर्थसंकल्पाची माहिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. मात्र या विकासकामांसाठी महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी ६० कोटी रूपये कर्ज घ्यावे लागणार आहे.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, केएमटीसाठी १०४ बसेस खरेदी, केशवराव भोसले नाटय़गृह व खासबाग मदान विकास, कळंबा तलाव विकास आदी केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या ७८२ कोटींच्या योजनांच्या विशेष प्रकल्पासाठी मंजुरी तिथीसह महापालिकेच्या महसुली जमा २८२ कोटी ७३ हजार व भांडवली जमा ८१ कोटी ११ लाख ७२ हजार १७७ मिळून एकूण कोल्हापूर महापलिकेचा ११४५ कोटी ४७ लाख व ५२ लाख ४९ हजार रूपये शिलकेचा २०१४-१५ सालचा अर्थसंकल्प आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी स्थायी समिती सभेत सभापती सचिन चव्हाण यांच्याकडे सादर केला. नागरिकांच्यावर कोणतीही करवाढ न लादता शहरातील विकासकामासह विशेष प्रकल्प साकारणारा हा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.
आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी म्हणाल्या, की शहारासाठी मंजूर झालेल्या प्रकल्पासाठी महापालिकेला स्वनिधीतून मोठय़ा प्रमाणात मनपाच्या हिश्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. याचा विचार करून २०१४-१५ सालचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यामध्ये काळम्मावाडी थेट पाईपलाईनच्या योजनेसाठी ४२३ कोटी २२ लाख मंजूर झाले असून केशवराव भोसले नाटय़गृह व खासबाग मदान यासाठी १० कोटी रूपये कळंबा तलाव व परिसर विकासासाठी १० कोटी, केएमटी उपक्रमाच्या १०४ बसेससह इतर पायाभूत सुविधांसाठी ४४ कोटी २४ लाख, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी २८ कोटी ३१ लाख, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी १४ कोटी ५० लाख, टाकाया येथे भराव क्षेत्र विकसीत करण्यासाठी ६ कोटी ४० लाख, फिश मार्केट ३ कोटी, झोपटपट्टी विकासाअंतर्गत घरकुलासाठी ८ कोटी ९५ लाख या योजना केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाकडून मंजूर झाल्या आहेत.
महिती तंत्रज्ञान पार्क, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सक्षमीकरण, हेरिटेज इमारतीचे सुशोभीकरण, अपंग कल्याण कार्यक्रम, सार्वजनिक स्वच्छता व घन कचरी व्यवस्थापन यासाठी महापालिकेने विशेष तरतूद केली आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून विशेष निधी उपलब्ध करून घेण्यात येणार असून नगरोत्थान योजनेअंतर्गत १०८ कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या कामासाठी व सांडपाणी प्रकल्पाच्या ७८ कोटींच्या कामासाठी ९१ कोटी महापालिकेला आपल्या हिश्याची रक्कम भरण्यासाठी कर्ज वितीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करावे लागत आहे. तसेच काळम्मावाडी योजनेसाठीही ६० कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. शहरात अनेक मोठे प्रकल्प राबविण्यात येत असून इतरही कामासाठी तसेच रस्ते गटर्स आदीसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
महसुली जमेमध्ये वाढ करताना नागरिकांच्यावर कराचा बोजा न वाढवता सध्याच्या करदात्यांनी प्रामाणिकपणे कर द्यावा, तसेच कर न देणाऱ्या व्यावसायिकांनी कर भरावे व यातून करदात्यांची संख्या वाढवून महसूल वाढविण्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त बिदरी यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त संजय हेरवाडे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, संजय सरनाईक, संजय भोसले आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2014 4:00 am

Web Title: waste processing project to prevent pollution of panchaganga
टॅग Kolhapur
Next Stories
1 दासनवमीचा कार्यक्रम सज्जनगडावर उत्साहात
2 मराठी भाषा टिकवणा-यांसाठी महाराष्ट्राने काय केले -खलप
3 बलात्कार, खून करणा-या दोघांना सांगलीत अटक
Just Now!
X