लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या जवळपास दोन लाखांनी वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर, विधानसभा निवडणुकीत १९ नवीन मतदान केंद्रांची वाढ होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची एकूण संख्या ४२१० वर पोहोचणार आहे. दरम्यान, प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव आणि अन्य काही कारणांस्तव ५६ मतदान केंद्रांच्या स्थानात बदल करण्यात येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यांत नेहमीच्या तुलनेत सर्वाधिक मतदान नोंदविले गेले. मतदार जनजागृती अभियानामुळे मतदान करण्याकडे बहुतेकांचा ओढा राहिला. यामुळे निवडणुकीनंतर मतदार नाव नोंदणीच्या निरंतर मोहिमेला नवमतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेंतर्गत एक लाख ८६ हजार मतदारांची नावे यादीत नव्याने समाविष्ट झाली आहेत. विशेष मोहिमेंतर्गत १९,७०३ अर्ज प्राप्त झाले असून छाननीअंती ही नावेही समाविष्ट होऊ शकतील. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांची संख्या जवळपास दोन लाखांनी वाढून ४० लाख ७३ हजार २३५ वर पोहोचली आहे. मतदारांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन निवडणूक शाखेने मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदगाव विधानसभा मतदारसंघात १, मालेगाव मध्य ३, सिन्नर १, नाशिक मध्य ८, नाशिक पश्चिम ६ अशी मतदान केंद्रांची संख्या वाढणार असल्याचे तहसीलदार वंदना खरमाळे यांनी सांगितले. न्
ााशिक मध्य मतदारसंघात या केंद्रांची संख्या सर्वाधिक वाढणार आहे, तर मालेगाव बाह्य, बागलाण, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी, नाशिक पूर्व, देवळाली व इगतपुरी या मतदारसंघांत एकही केंद्र वाढणार नाही. याव्यतिरिक्त एकूण ५६ मतदान केंद्रांच्या स्थानात बदल करण्यात येणार आहे. सोयी-सुविधांचा अभाव, मोडकळीस आलेली वर्गखोली अशा विविध कारणांमुळे जुन्या केंद्राचे स्थान बदलले जाणार आहे. त्यात नांदगाव व नाशिक पश्चिम मतदारसंघात प्रत्येकी ३, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नाशिक मध्य प्रत्येकी ४, कळवण ५, येवला व दिंडोरी प्रत्येकी १, सिन्नर १५, निफाड व इगतपुरी प्रत्येकी ८ अशा एकूण ५६ केंद्रांचा त्यात समावेश असल्याचे खरमाळे यांनी सांगितले.
अशी असतील नवीन मतदान केंद्रे
’नाशिक मध्य – कथडा परिसरातील मनपा विद्यानिकेतन व मनपा उर्दू शाळा, माणेकशानगर येथील रवींद्रनाथ विद्यालय, बी. डी. भालेकर विद्यालय, काठेगल्लीतील अटलबिहारी वाजपेयी प्राथमिक विद्यामंदिर, डीजीपीनगरमधील रेऑन इंटरनॅशनल स्कूल, इंदिरानगर येथील सुखदेव विद्यामंदिर,
’नाशिक पश्चिम- सातपूर येथील प्राथमिक शाळा, कामटवाडे येथील धन्वंतरी वैद्यकीय महाविद्यालय, मोरवाडी येथील महापालिका शाळा, इंदिरानगर येथील डे-केअर स्कूल, प्रशांतनगर येथील महापालिका शाळा, मनपा व्यायामशाळा. नांदगाव- नगरपालिका शाळा क्रमांक १३,
’मालेगाव मध्य- जेएटी गर्ल्स हायस्कूल, छत्रपती शिवाजी टाऊन हॉल व मनपा उर्दू शाळा क्रमांक २० आणि ६४, सिन्नर- भिकुसा हायस्कूल.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2014 रोजी प्रकाशित
मतदार संख्या वाढल्याने जिल्ह्यत १९ नवीन मतदान केंद्रे
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मतदारांची संख्या जवळपास दोन लाखांनी वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर, विधानसभा निवडणुकीत १९ नवीन मतदान केंद्रांची वाढ होणार आहे.

First published on: 23-09-2014 at 07:20 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 new polling centres in district