शिर्डी येथील साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत राहुरी येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यलयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. संगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यलयास व्दितीय तर शिर्डी येथील साईबाबा कनिष्ठ महाविद्यलयाने तृतीय क्रमांक मिळविला. श्रीगोंदे येथील महादजी िशदे महाविद्यल व लोणी येथील पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुलला उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य विकास शिवगजे व बलभिम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी उत्तम गोंदकर, प्राचार्य शिवलींग पटने, बी. डी. साबळे, कामगार अधिकारी गमे आदी उपस्थित होते. स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. पहिल्या फेरीअखेर दहा संघ पात्र ठरल्याने त्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात आला. दुसरी व तिसरी फेरी अतीशय रंगतदार झाली.