डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (पुणे) व शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने मागास, भटके, ओबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय स्पर्धा परीक्षा तयारीकरिता नि:शुल्क व अनिवासी मार्गदर्शन वर्ग चालविले जातात. सोलापूर विद्यापीठात कार्यरत असलेल्या या मार्गदर्शन केंद्रातील ७० विद्यार्थ्यांसाठी ३८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या मार्गदर्शन केंद्रात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना (ज्यांची उत्पन्न मर्यादा सहा लाखांपेक्षा कमी) दरमहा चार हजार विद्यावेतन व पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला जातो. तर अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्रात मोफत प्रवेश दिला जातो. सोलापूर विद्यापीठात हे मार्गदर्शन केंद्र जानेवारी २०१२ पासून सुरू झाले असून पहिल्या तुकडीतील लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी २० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. या मार्गदर्शन केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. विद्यापीठात विशेष कक्षामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्रासाठी विविध अद्ययावत सुविधा प्राप्त करून देण्यात आल्या आहेत. प्रा. डॉ. आर. बी.भोसले यांच्या देखरेखीखाली हे मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे.