मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणावर भाजप, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, नवनिर्माण सामाजिक बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यात ६४ जोडपी विवाहबद्ध झाली.
 या सोहळ्याचे उद्घाटन आमदार अतुल देशकर यांनी केले. याप्रसंगी आमदार नाना शामकुळे, सपना मुनगंटीवार, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुंभरे, संध्या गुरनुले, मूलच्या सभापती रेखा गद्देवार, वनिता कानडे, संजय गजपुरे, रामपाल सिंह, किशोर जोरगेवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, मूलच्या नगराध्यक्ष उषा शेंडे, उपाध्यक्ष अनिल संतोषवार, प्रभाकर भोयर, उपसभापती सुनील आयलनवार, चंदू मारगोनवार, वंदना फाले, गजानन वलकेवार, राजीव गोलीवार, भोजराज डुंबे, राम लाखिया, प्रकाश धारणे, जयंत मामीडवार, अंजली घोटेकर, सरिता बेडेकर उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी  कर्ज काढून लग्न समारंभ साजरे करण्याला विरोध करीत सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना प्रथमत: मांडली. ती  पुढे नेऊन आमदार मुनगंटीवार यांनी भाजपच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून या भागातील गरीब पालकांसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे, असे मत आमदार अतुल देशकर यांनी व्यक्त केले. आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुंभरे यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. प्रास्ताविक संध्या गुरनुले यांनी केले. सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते सर्व वर-वधूंना संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वधूंना सोन्याचे मंगळसूत्र आयोजकांच्या वतीने भेट देण्यात आले. संचालन मोंटू सिंह आणि नगरसेवक प्रवीण मोहुर्ले यांनी केले.  आयोजनाकरिता अनिल साखरकर, चंद्रकांत आष्टनकर, रामकृष्ण नखाते, सचिन गद्देवार, वर्षां परचाके, मिलिंद खोब्रागडे, तुळशीराम कुंभारे, दिवाकर फाले, नंदू रणदिवे, आनंद पाटील ठिकरे, बबन गुंडावार, सुरेश पाटील, अहीरकर, कोकिळा गुरनुले, लीना बद्देलवार, शारदा नन्नावरे, वर्षां चौधरी, सपना भोयर यांनी सहकार्य केले.