औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद ग्रामीण संघाने ११७ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सवरेत्कृष्ट धावपटू म्हणून पुरुष गटात जालन्याचे अखिल पटेल, महिला गटात औरंगाबाद ग्रामीणच्या अनुराधा चव्हाण यांनी विजेतेपद मिळविले. हॉकीमध्ये औरंगाबाद शहर संघाने यश प्राप्त केले.
गेल्या २९ नोव्हेंबरपासून औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. वेगवेगळ्या ताणतणावाखाली काम करणाऱ्या पोलिसांना विरंगुळ्याचे काही क्षण मिळावेत, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा घेतल्या जातात. ११ प्रकारात होणाऱ्या या स्पर्धामध्ये औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागाच्या खेळाडूंनी यश मिळविले. हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल – औरंगाबाद शहर, व्हॉलीबॉल, कबड्डी, अॅथलेटिक्स, कुस्ती, हँडबॉल, बॉक्सिंग, ज्युदो – औरंगाबाद ग्रामीण, खो-खोचे विजेतेपद उस्मानाबाद संघाने राखले. ज्यूदोमध्ये औरंगाबाद ग्रामीण व बीड या दोन्ही संघांना समान गुण मिळाले.
त्यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. तसेच वेटलिफ्टिंगमध्ये जालना व बीड या दोन्ही संघांना समान गुण मिळाले. औरंगाबाद शहर संघास १०१
गुण मिळाले. उस्मानाबादला ६२,
बीडला ६०, जालन्याला ५६ गुण
मिळाले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
औरंगाबाद ग्रामीणला सर्वसाधारण विजेतेपद
औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत औरंगाबाद ग्रामीण संघाने ११७ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सवरेत्कृष्ट धावपटू म्हणून पुरुष गटात जालन्याचे अखिल पटेल, महिला गटात औरंगाबाद ग्रामीणच्या अनुराधा चव्हाण यांनी विजेतेपद मिळविले. हॉकीमध्ये औरंगाबाद शहर संघाने यश प्राप्त केले.
First published on: 05-12-2012 at 02:16 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaurangabad village gets victory