भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी अॅड. भरत पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. या वेळी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र, या निवडीवेळी मावळते जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे, दत्ताजी थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने एका गटाने या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याचे चित्र जोरदार चर्चेत होते.
साताऱ्यातील कल्याण रिसॉर्ट येथे भाजप जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया घेण्यात आली. सर्वप्रथम तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या. पुणे महानगरपालिकेचे गटनेते अशोक येनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यतील भाजपच्या संघटनात्मक निवडी पार पडल्या. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष कांताताई नलावडे, प्रदेशप्रतिनिधी नरेंद्र पाटील, शहराध्यक्षा सुवर्णा पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, जिल्हाध्यक्षपदी अॅड. भरत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी त्यांची नूतन कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यामध्ये उपाध्यक्षपदी सोपानराव गवळी (कोरेगाव), उत्तमराव भोसले (फलटण), मीनल इनामदार (वाई), डॉ. उज्ज्वल काळे (माण), अजय परदेशी (सातारा), रावसाहेब क्षीरसागर (पाटण), प्रदीप क्षीरसागर (वाई), सरचिटणीसपदी रवींद्र भोसले (सातार), विष्णू पाटसकर (कराड), बाळासाहेब खाडे (माण), अनुप सूर्यवंशी (खंडाळा) यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी अॅड. नितीश शिंगटे, युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील काळेकर यांची, तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड. शुभांगी भुतकर यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रवक्तापदी विजय काटवटे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीचा आणखी विस्तार अपेक्षित असल्याचे भरत पाटील यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2012 रोजी प्रकाशित
भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी अॅड. भरत पाटील यांना दुसऱ्यांदा संधी
भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी अॅड. भरत पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. या वेळी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र, या निवडीवेळी मावळते जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे, दत्ताजी थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने एका गटाने या निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याचे चित्र जोरदार चर्चेत होते.
First published on: 31-12-2012 at 09:39 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ad bharat patil again elected as bjp satara district chairman