भारतीय युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे सोमवारी दर्शन घेतले. या वेळी देवीला नऊवारी साडी अर्पण करून भवानीमाता दरबारात केलेल्या कवचयज्ञात ठाकरे यांच्या हस्ते पूर्णाहुती देण्यात आली. दरम्यान, ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चतन्य निर्माण झाले आहे.
ठाकरे यांचे सोमवारी तुळजापूरला आगमन झाले. खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते सुभाष देसाई, शिवसेनेचे उपनेते खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, रवींद्र निर्लेकर यांची उपस्थिती होती. शहरप्रमुख सुधीर कदम यांनी ठाकरे यांचे मंदिरात स्वागत केले. उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी आयोजित केलेल्या कवचयज्ञात ठाकरे यांच्या हस्ते पूर्णाहुती देण्यात आली. उपाध्ये बंडू पाठक व वेदशास्त्रसंपन्न नागेश अंबुलगे यांनी पौरोहित्य केले.
तुळजाभवानी दर्शनप्रसंगी ठाकरे परिवाराचे वंशपरंपरागत पुजारी कुमार इंगळे यांनी पूजेचा विधी पार पाडला. पाळीचे पुजारी शिवराज पाटील, नीलेश कदम, रूपेश कदम यांनी आरती केली. जिल्हाप्रमुख प्रा. रवींद्र गायकवाड, उद्योजक राजेंद्र मिरगणे, गौरीश शानबाग, शिवसेना महिला आघाडीप्रमुख श्यामल वडणे, शहरप्रमुख सुधीर परमेश्वर, आमदार ओम राजेिनबाळकर व ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, युवा सेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, किरण गायकवाड या वेळी उपस्थित होते. तुळजापूर शहरात आगमन झाल्यानंतर महायुतीमधील भाजपचे नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, विकास मलबा, विपीन िशदे, सुहास साळुंके, रिपाइंचे शुभम कदम आदींनी ठाकरे यांचे स्वागत केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
आदित्य ठाकरेंकडून तुळजाभवानीस पूर्णाहुती
भारतीय युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे सोमवारी दर्शन घेतले. या वेळी देवीला नऊवारी साडी अर्पण करून भवानीमाता दरबारात केलेल्या कवचयज्ञात ठाकरे यांच्या हस्ते पूर्णाहुती देण्यात आली.
First published on: 21-01-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thakare perspective of tuljabhavani