रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती पाडा परिसरात तयार करण्यात आलेले भेसळयुक्त तेल आणि टेम्पो आदी माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत दोघांना अटक करण्यात आली आहे.
गणपती पाडा येथे भेसळयुक्त तेल तयार करून ते एका नामांकित कंपनीच्या नावाने विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी छापा मारून पोलिसांनी ऑईल जप्त केले. ग्रीस, प्लास्टिक दाणे, काळ्या तांदळाचे पाणी इत्यादीच्या साह्य़ाने किशोर बुटाला आणि रवींद्रकुमार निशाद हे भेसळयुक्त ऑईल तयार होते.
त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून तेल आणि टेम्पो असा सुमारे ७ लाख १८ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.