अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूर शहरातील गांधी चौकात अंनिस जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात रवि बापटले, अतुल देऊळगावकर, वैजनाथ कोरे, दिलीप आरळीकर, प्राचार्य मधुकर मुंडे, सुपर्ण जगताप, अनिल दरेकर, माधव बावगे, शरद झरे, अंगद सूर्यवंशी, उत्तम मोरे, अॅड. शेखर हविले आदींसह सर्वपक्षीय कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर गांधी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.