सीएसी-ऑलराऊंडर आणि वायुसेना मेंटेनन्स कमाड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय वायुसेनेतील सैनिकांचे दोन दिवसांचे साहसी शिबीर रामटेकला नुकतेच घेण्यात आले. या शिबिराने वायुसैनिकांचा उत्साह वाढविला आहे.
या शिबिराचे उद््घाटन विंग कमांडर वेणुगोपाल यांच्या हस्ते झाले. या शिबिरात एअर वॉरियर्स तसेच वायुसेनेतील अधिकाऱ्यांचा समावेश होता.
अधिकाऱ्यांच्या मुला-मुलींनीसुद्धा साहसी शिबिराचा अनुभव घेतला. शिबिरात पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग या सारख्या हवाई खेळांचा समावेश होता. निसर्गाशी हितगुज, संघटन कौशल्य विकसित करणे, एकाग्रता वाढविणे, खेळांच्या माध्यमातून मानसिक ताण कमी करणे आणि कार्यक्षमता वाढविणे या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले.
एअर मार्शल जे.एस. क्लेर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिरात ग्रुप कॅप्टन टी.एस. बाबू, विंग कमांडर वेणुगोपाल यांनी सैनिकांचा उत्साह वाढविला. शिबिरासाठी सीएसी-ऑलराऊंडरचे संचालक अमोल खंते, प्रशिक्षक गजानन रिंढे, अजय गायकवाड, मनीष मख, भवन पटेल, दिनेश इवनाते यांनी सहकार्य केले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
साहसी शिबिराने वायुसेनेतील सैनिकांचा वाढला उत्साह
सीएसी-ऑलराऊंडर आणि वायुसेना मेंटेनन्स कमाड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय वायुसेनेतील सैनिकांचे दोन दिवसांचे साहसी शिबीर रामटेकला नुकतेच घेण्यात आले. या शिबिराने वायुसैनिकांचा उत्साह वाढविला आहे. या शिबिराचे उद््घाटन विंग कमांडर वेणुगोपाल यांच्या हस्ते झाले. या शिबिरात एअर वॉरियर्स तसेच वायुसेनेतील अधिकाऱ्यांचा समावेश होता.

First published on: 17-11-2012 at 12:40 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air forces gets intrested by arrenging the dearing camp