विक्रमसिंह पाटणकर राजकारणातून समाजकारण करीत आहेत. अनेक धक्के सहन करून जनतेच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहण्याचे कसब त्यांच्याकडून शिकावे. कामगार चळवळीत काम केल्याने त्यांचा अनुभव कधी आला नाही, परंतु मंत्री झाल्यानंतर संयम कसा पळावा यावर पाटणकरांची आठवण येत असल्याचे सांगताना २०१४चे मुख्यमंत्री अजित पवारच असतील, असे मत पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
पाटणच्या भाऊ मोकाशी सभागृहात पाटण विधानसभा मतदारसंघातर्फे आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विक्रमसिंह पाटणकर होते, तर राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष नामदार रामराजे निंबाळकर, आमदार नरेंद्र पाटील, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक सुजित पाटील, विक्रमबाबा पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांची उपस्थिती होती.
पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या ३५ वर्षांच्या कामाचे चीज झाले असा विश्वास विक्रमसिंह पाटणकर यांना वाटावा अशा २० हजारांच्या मताधिक्यांचा विजय ‘मिशन २०१४’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले.
रामराजे निंबाळकर म्हणाले, की मुंबई-पुण्यात असणारी कामगारांची ताकद पाटण मतदारसंघाला मिळणार आहे. पाटणकरांना उमेद देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. नरेंद्र पाटील यांनी अनेक प्रश्नांबाबत आग्रही असणाऱ्या पाटणकरांना माथाडींची पूर्ण ताकद दिली जाईल असा विश्वास दिला. विक्रमसिंह पाटणकर यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक राजाभाऊ शेलार यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2013 रोजी प्रकाशित
भावी मुख्यमंत्री अजित पवारच- शशिकांत शिंदे
विक्रमसिंह पाटणकर राजकारणातून समाजकारण करीत आहेत. अनेक धक्के सहन करून जनतेच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहण्याचे कसब त्यांच्याकडून शिकावे. कामगार चळवळीत काम केल्याने त्यांचा अनुभव कधी आला नाही, परंतु मंत्री झाल्यानंतर संयम कसा पळावा यावर पाटणकरांची आठवण येत असल्याचे सांगताना २०१४चे मुख्यमंत्री अजित पवारच असतील, असे मत पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
First published on: 15-08-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar is prospective chief minister shashikant shinde