िपटय़ा मारणे व शरद मोहोळच्या टोळीतील दोघांच्या खुनात सहभागी असल्याचा आरोप असलेला व फरार झालेला गणेश मारणे टोळीतील सराईत गुन्हेगार विठ्ठल महादेव शेलार (वय २४) याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत या गुन्हेगाराकडून एक पिस्टल व गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे.
शेलार याच्यासह त्याचा साथीदार रोहीत राजकुमार वैराट (वय १९, रा. देहुगाव) यांना अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना या गुन्हेगारांबाबत माहिती मिळाली. शेलार हा पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून चांदणी चौकातून पुण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. शेलार हा िपटय़ा मारणे खून खटल्यातील आरोपी असून सध्या तो न्यायालयातून फरार आहे. त्याचप्रमाणे शरद मोहोळ टोळीतील दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळून टाकल्याच्या प्रकरणातही शेलार आरोपी आहे.