हातात तलवार घेऊन वर्गणीच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोन युवकांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे. परमजितसिंग गुरुचरणसिंग लोहिया उर्फ जेटील सरदार (३१) आणि अमित जागेश्वर मडावी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आरोपी परमजितसिंग आणि अमित हे दोघेही स्कॉर्पियो गाडीने यशोधरानगर, आनंदनगर, बिनाकी कांजी हाऊस मार्गावर राहणाऱ्या संजय आनंदराव धापोडकर यांच्या घरी आले. परनजितसिंग आणि अमितने गाडी धापोडकर यांच्या घरासमोर उभी केली आणि त्यांना आवाज दिला. धापोडकरकांनी घराच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना दोन युवक हातात तलावर घेऊन दिसले. खाली उतरा आणि नाही तर घरात येऊन खून करू अशी घमकी दिली. रात्रीची वेळ असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक बाहेर पडले नाही. आरोपींनी पाच लाख रुपयाची मागणी केली. वर्गणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, शेजारी असलेल्या लोकांनी यशोधरा पोलिसांना फोन करून माहिती दिली मात्र तो पर्यंत दोन्ही आरोपीनी तेथून पळ काढला होता. संजयने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून अमित आणि परमजित यांना त्यांच्या घरून अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
वर्गणीच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
हातात तलवार घेऊन वर्गणीच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोन युवकांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे. परमजितसिंग गुरुचरणसिंग लोहिया उर्फ जेटील सरदार (३१) आणि अमित जागेश्वर मडावी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
First published on: 27-08-2013 at 08:45 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest to two for takeing tribute