राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड झाल्यानंतर शुक्रवारी त्यांचे इचलकरंजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाडे यांचा सत्कार केला.     
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी आवाडे यांची दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे निवड झाली होती. या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर आवाडे यांचे शुक्रवारी इचलकरंजीत आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राजकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रीय पातळीवरील साखर कारखाना महासंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल आवाडे यांचा विविध सहकारी संस्थांच्यावतीने तसेच नगरपालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी आमदार राजू आवळे, शहर काँग्रसचे अध्यक्ष अशोक आरगे, धोंडिलाल शिरगावे, सतीश डाळ्या, रवी रजपुते, सुरेश गोंदकर, मुकुंद पोवार आदी उपस्थित होते. तसेच कल्लाप्पाण्णा इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्यावतीने बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर यांनी आवाडे यांचा सत्कार केला. बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सरव्यवस्थापक टी.टी.कुंभार, संचालक विलास ताडळे, उगमचंद गांधी, महमंद मुजावर, सुनील हावळ, राजू पाटील, पांडुरंग बिरंजे, कलावंत,कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र बचाटे, सुनील खराडे, सहायक सरव्यवस्थापक रमेश निपाणीकर,सुजाता जाधव, काजवे आदी या वेळी उपस्थित होते