मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय रंजक पद्धतीने मांडण्याचा कल मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे. ‘बालक पालक’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक रवी जाधव यांनी बीपी ही एकांकिका आणि नाटक रूपेरी पडद्यावर मांडले. लैंगिकता विषयक ज्ञान पौगंडावस्थेतील मुलांमध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी चित्रपटाद्वारे केला. हा चित्रपट येत्या रविवारी, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवरून दाखविण्यात येणार आहे. हा या चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ आहे.