‘बीओटी’ तत्त्वावरील प्रकल्प
महापालिका शहरातील ५० टन ओला कचरा वापरून बायोगॅसची निर्मिती करणार असून हा प्रकल्प निर्मिती ‘बांधा व वापरा’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘ईओआय’ मागविण्यात येणार आहे. स्थायी समितीने याला मंजुरी दिली आहे, असे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सांगितले.
शहरात हॉटेलचा कचरा, अन्नपदार्थ, तसेच दवाखान्यातून निर्माण होणार कचरा यापासून बायोगॅस निर्माण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या योजना आयोगाकडून अनुदान प्राप्त करण्यासाठी डीपीआर करून आयोगाला सादर करण्यात येणार आहेत. नवीन डीपीआरप्रमाणे नवीन प्रस्ताव बीओटी तत्त्वावर काम करण्यासाठी मागविण्यात येणार आहे. हे काम करण्यास इच्छुक कंत्राटदाराला महापालिकेच्या जागेवर प्रकल्प उभारावा लागेल.  ६०० टन कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ८५० टन कचरा दररोज निर्माण होत असतो.  २५० टन कचऱ्यातून बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे.
शहरात विविध ठिकाणी फुटपाथवर उभारण्यात आलेल्या बॅनर स्टॅन्ड जाहिरातीचे अधिकार देण्याविषयी प्राप्त झालेल्या मे. मिराज यांची ९३ लाख रुपये किमतीची निविदा स्थायी समितीने मंजूर केली. ९० लाखाची मे. किलातुझ यांची तर मे. एव्हीआय इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर यांची ९० लाख २१ हजाराची निविदा होती.
महापालिकेच्या हद्दीतील गरीब आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घरकूल बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समिती काही सूचना व सुधारण करून मंजूर केला. स्वस्त घरकूल योजना राबविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.