दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा आणि त्यात उद्भलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणावणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहोचणे या व इतरही अनेक कारणांमुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाली असून एकेकाळी मोठय़ा संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जनावरे राखणाऱ्या गुराख्यांवरही बेकारीची कु ऱ्हाड कोसळली आहे.
पूर्वी ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळ्यासह इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाई-म्हशी पाळायचे. अनेक चाकरमानी मंडळीही हौसेखातर गाई-म्हशी बाळगून राहत. बेरोजगारीवर मात करीत अनेकांनी सुरू केलेला पशुपालन व दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला होता. गुराख्यांकडे सांभाळण्यासाठी येणाऱ्या जनावरांची संख्या दीडशे ते दोनशे होती. या व्यवसायातून गुराख्यांना मोठा रोजगार मिळायचा. आजच्यासारखी पाणी आणि चारा टंचाई तेव्हा नव्हती. हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळायचा. चाऱ्यांच्या पेंडीचे भाव सामान्य शेतक ऱ्यांना परवडणारे होते. पाच दहा रुपयात हिरव्यागार लुसलुशीत गवाताचा भारा मिळायचा. परंतु, चारा आणि इतर वस्तूंमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई गुरांची आणि गोठय़ांची संख्या कमी झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात प्रत्येक तालुका पातळीवर किमान ५ ते ६ गोठे आणि शंभर ते सव्वाशे जनावरे, अशी परिस्थिती असताना गेल्या दोन वर्षांत गोठे आणि सोबतच गायीची संख्यादेखील अचानक कमी झाली आहे.
काही वर्षांंपासून पर्जन्याचे प्रमाण कमालीचे घटल्याने ग्रामीण भागात शेतक ऱ्यांना चारा व पाणी प्रश्न प्रकर्षांने जाणवू लागला आहे. चाऱ्याचे भाव आकाशाला टेकले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे. विहिरींना पुरेसे पाणी नाही, पाणी असेल तरी वीज नाही, अशी बिकट स्थिती आहे. अशा दुष्काळजन्य स्थितीत जनावरे सांभाळणे शेतक ऱ्यांना परवडेनासे झाले आहे. उमरेड मार्गावरील मोठय़ा प्रमाणात बैल, गाय आणि म्हैस यांच्यासह विविध पाळीव पशु पक्ष्याची बेभाव विक्री केली जात आहे.
शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्यामुळे आणि त्यातही शेतीला पुरेसे पाणी मिळत नसेल व जनावरांची निगा राखली जात नसेल तर शेतक ऱ्यांना शेतामध्ये काम करणे कठीण आहे. सरकारचे जनावरांच्या चारा-पाण्याकडे दुर्लक्ष आहे. शेतकरी, पशुपालंकासमोर ही मोठी समस्या उभी ठाकली आहे.
सोयाबीनसारख्या नगदी पिकांमुळे ज्वारीच्या लागवडीत घट झाल्यामुळे कडबा पेंडी ४० ते ४५ रुपयाला एक याप्रमाणे पशुपालकाला विकत घ्यावी लागत आहे. कडब्याचे दर वाढल्यामुळे पशुपालकांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. सात ते आठ वर्षांपूर्वी शेकडा ९०-१०० रुपयाप्रमाणे कडबा मिळत असे पेरणीच्या तोंडावर शेतकरी शे-दोनशे कडबा पेंडी विकत घेत होता. कडब्यांची गंजी वर्षभर शेतात लावलेली असायची पण नगदी पिकांच्या पद्धतीमुळे ज्वारीखालील क्षेत्र झपाटय़ाने घटले. सोयाबीन, कापूस, कडधान्य, लागवडीकडे वाळलेल्या शेतक ऱ्यांना कडबा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे अनेक विहिरींना पाणी नाही, बोअर वेली आटल्या आहेत. त्यामुळे शेतामध्ये ओलिताचे क्षेत्र कमी झाले आहे. जनावरांसाठी चारा पाणी समस्या निर्माण झाली आहे. एकेकाळी साठ रुपये शंभर याप्रमाणे कडबा कोणी विकत घेत नसे आज याच कडब्याचे दर वाढले आहे. नियोजनाचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटविले आहे. त्यामुळे चारा टंचाई उद्भवली आहे त्यामुळे पशुपालक पाळीव जनावरे विक्रीस काढत असल्याचे शेतक ऱ्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2013 रोजी प्रकाशित
चारा टंचाईमुळे गोठे रिकामे; गुराख्यांवरही बेकारीची कुऱ्हाड
दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा आणि त्यात उद्भलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणावणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहोचणे या व इतरही अनेक कारणांमुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाली असून एकेकाळी मोठय़ा संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
First published on: 21-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byre are empty due to fooder shortage herdsman are jobless