केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस आणि शरद सहकारी बँकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सोलापुरात आयोजिलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ४६ शाळांतील विद्यार्थी व स्त्री-पुरूष नागरिक मिळून ९६४४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यात खुल्या गटात पुरुषांमध्ये अविनाश चव्हाण तर महिला गटात श्रीदेवी बनसोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थी गटात १६ वर्षांखालील मुलांमध्ये किरण राठोड तर मुलींच्या गटात सुनीता रुपनर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील, पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, उपमहापौर हारून सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे संयोजक, माजी महापौर मनोहर सपाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या स्पर्धेचा निकाल असा: ९ वर्षांखालील मुले: १)सौरभ दादासाहेब हावळे, २) सुयश राजेश वाघमारे, ३) चैतन्य दिलीप सुरवसे, ९ वर्षांखालील मुली: १) कावेरी सीताराम हावळे, २) वृषाली संजय जावीर, ३) मुस्कान अल्लाऊद्दीन शेख, १३ वर्षांखालील मुले: १) चैतन्य विजयकुमार कुंभार, २)विशाल धोंडिराम राठोड, ३) आकाश बसवराज अमहिपूर, १३ वर्षांखालील मुली: १) विजयालक्ष्मी परमेश्वर पाटील, २) ऐश्वर्या अशोक सुरवसे, ३) दिव्या संतोष भडंगे, १६ वर्षांखालील मुले: १) किरण श्रीमंत राठोड, २) सुरत अशोक हत्ते, ३) अक्षय रावसाहेब खांडेकर, १६ वर्षांखालील मुली: १) सुनीता संतोष रुपनर, २) स्वप्नाली माणिक वाघमारे, ३) उमा पंडित कामकवाडे.
पुरूष खुला गट: १) अविनाश अंबादास चव्हाण, २) दत्तात्रेय भागवत वाळेकर, ३) रतन धरूसेन शितोळे, महिला खुला गट: १) श्रीदेवी सोमण्णा म्हेत्रे, २) आरती मधुकर सुरवसे, ३) स्वाती राजेंद्र वांझटे, ४५ वर्षांवरील पुरूष: १) संजय मनोहर बनसोडे, २) निरंजन ज्ञानेश्वर पडवळकर, ३) अनिल नागनाथ बारबोले, महिला गट: १) आरती आसादे, २) सुनीता कारंडे, ३) नीलिमा पुष्पक. ह०वर्षांवरील पुरूष: विकास अर्जुन चव्हाण, २) गुरूलिंग कल्लूरकर, ३) चंद्रकांत रामचंद्र सावंत.