पालकांनी मुलांवर अपेक्षांचे दडपण न ठेवता मुलांच्या आवडीचे क्षेत्र त्यांना निवडू द्यावे, असे प्रतिपादन डॉ. विलास डांगरे यांनी प्रहार संस्थेच्या प्रथम शौर्य शिबिराच्या समारोप सोहोळ्यात केले. प्रहार संस्थेच्या प्रशिक्षणाने नवीन पिढी चांगली तयार होत आहे, असेही ते म्हणाले.
प्रहार समाज जागृती संस्थेद्वारा आयोजित प्रहारगड येथे पहिले शौर्य शिबीर २१ ते २७ एप्रिलदरम्यान नुकतेच  झाले. या शिबिरात ८५ प्रहारी मुलेमुली सहभागी झाले होते. शौर्य शिबिराच्या समारोप सोहोळ्याला शिबिरार्थी प्रहारींनी उपस्थितांसमोर ऑब्स्टेकल्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलीत. नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रहारचे अध्यक्ष कर्नल सुनील देशपांडे यांनी शिबिराची माहिती, महत्त्व व उद्देश यासंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी आयोजित विविध स्पर्धामध्ये प्रहारींना बक्षिसे देण्यात आली.
निबंध स्पध्रेत रोशदा अफजल व डिंपल अग्रवाल यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. चित्रकला स्पध्रेत मंजिरी ताम्हणकर व प्रणाली वाकोडे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. क्रॉसकंट्री स्पध्रेत मुलांमध्ये प्रथम प्रवन हरडे व द्वितीय क्रमांक ओंकार देशपांडे यांनी प्राप्त केला. मुलींमध्ये प्रथम वंशिका वाघमारे व द्वितीय क्रमांक पूजा चन्नो यांनी प्राप्त केला. ऑब्स्टेकल्स स्पध्रेत मुलांमध्ये अभिदास हेजीब व वैभव वंजारी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर मुलींमध्ये आर्या कावडे व वैष्णवी मेंढे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ट्रेजर हंट स्पर्धेत प्रथम क्रमांक राणी लक्ष्मीबाई ग्रुप व टग ऑफ वॉरमध्ये प्रथम क्रमांक नीरजा भानोत ग्रुपने प्राप्त केला. याशिवाय विविध विषयांवर वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
समारोप सोहोळ्याच्या अखेरीस फ्लाईंग ऑफिसर शिवाली देशपांडे यांनी सर्व प्रहारींना प्रहारची शपथ दिली. प्रहारचे यापुढील शिबीर ५ ते ११ मे व १२ ते १८ मे या कालावधीत प्रहारगड येथे आयोजित करण्यात आले आहे. पचमढी येथे १२ ते १८ मे जंगल भ्रमण शिबीर तसेच धर्मशाळा येथे हिमालयीन ट्रेकिंग शिबीर २१ मे ते १ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.