चोरीच्या गुन्हय़ात आरोपीकडून खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
उदगीर येथील मुजीब सय्यद शिकूर यास चोरीच्या गुन्हय़ात अटक न करण्यासाठी पोलीस नाईक महेश तांबारे याने ९ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपतच्या पोलिसांनी सापळा रचल्यानंतर तांबारे याने लाच घेतली नाही. पंचांसमक्ष लाच मागताच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. विभागाचे पोलीस अधीक्षक एस. डी. बाविस्कर, उपाधीक्षक अंकुशकर आदींनी ही कारवाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
लाचखोर पोलीस नाईक जाळय़ात
चोरीच्या गुन्हय़ात आरोपीकडून खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
First published on: 20-04-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Currupted police naik arrested