मतदान ओळखपत्रात फेरफार करून बनावटगिरी करणाऱ्या पार्वती शंकर आडम या महिलेस पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला. या महिलेकडून बोगस मतदान ओळखपत्राचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पार्वती आडम ही या रॅकेटमधील एजंट असून तिच्याकडून ५०हून अधिक बनावट ओळखपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ओळखपत्र दिले जाते. या ओळखपत्रामध्ये फेरफार करणारी टोळी कार्यरत आहे. त्यासाठी एका कार्डकरिता ३०० रुपये घेतले जातात.आडमसारख्या एजंटना सूत्रधाराकडून १०० रुपये कमिशन दिले जाते. मूळ कार्डामध्ये वयाच्या ठिकाणी त्यांचे लॅमिनेशन काढून फेरबदल केला जात होता आणि ते पुन्हा लॅमिनेट करून लोकांना पोहोचविले जात होते. या प्रकारे आजरा, चंदगड, गडहिंग्लज भागात आडमने अनेकांना बनावट पद्धतीने वय वाढवून दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2013 रोजी प्रकाशित
मतदान ओळखपत्रात फेरफार करणाऱ्या महिलेस कोठडी
मतदान ओळखपत्रात फेरफार करून बनावटगिरी करणाऱ्या पार्वती शंकर आडम या महिलेस पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला.
First published on: 30-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Custody to women for fraud in voter id card