केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विभागामार्फत ‘इन्स्पायर अवार्ड’ २०१२-१३ अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, उद्या, मंगळवार ३ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी शहरातील तीन शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. हुडकेश्वर येथील सेंट पॉल हायस्कूल, उच्च माध्यमिक विद्यालयात शहरातील पूर्व, दक्षिण व उत्तर भागातील माध्यमिक शाळा, नागपूर पूर्व झोन उच्च प्राथमिक शाळा, उमरेड, भिवापूर, कुही, मौदा तालुक्यातील सर्व शाळांचा सहभाग राहील. दक्षिण अंबाझरी मार्गावरील डी.आर.ए. मुंडले शाळेत नागपूर ग्रामीण, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, नरखेड येथील शाळा, श्रीकृष्णनगरातील आदर्श संस्कार विद्यालयात कामठी, पारशिवनी, रामटेक व सावनेर तालुक्यांतील शाळांचा सहभाग राहील. हे प्रदर्शन ५ सप्टेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले राहील.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विभागामार्फत ‘इन्स्पायर अवार्ड’ २०१२-१३ अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, उद्या, मंगळवार ३ सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आले आहे.
First published on: 03-09-2013 at 09:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District level science exhibition starting today