‘निमा’च्या बैठकीतील निर्णय
नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीने निमा हाऊस येथे आयोजित बैठक इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्लस्टर स्थापन करण्यास चालना देणारे पुढचे पाऊल ठरले.
केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांच्या वाढीसाठी आयोजित क्लस्टर संदर्भात असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तांत्रिक सल्लागार व्ही. एल. राजळे, प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांच्यासमवेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, कार्यकारिणी सदस्य, नाशिक जिल्ह्य़ातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उत्पादक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राजळे यांनी सादरीकरणाद्वारे नव्याने इलेक्ट्रॉनिक उद्योग वाढीसाठी केंद्र शासनाद्वारे प्रास्ताविक ग्रीन फिल्ड व ब्राऊन फिल्ड क्लस्टर संदर्भात माहिती दिली. क्लस्टरसाठी आवश्यक असलेली जागा, चाचणी सुविधा, पाणी, रस्त्यावरील दिवे आदी सुविधादेखील महाराष्ट्र औद्योगिक मंडळातर्फे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत सुरू असलेली इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणाऱ्या उद्योगांना एकत्रित येऊन एसपीव्हीद्वारे ब्राऊन फिल्ड क्लस्टर स्थापन करता येणार असून आवश्यकतेनुसार १०० एकरापासून तर दोन एकर जागेतही हे सामूहिक सुविधा केंद्र स्थापन करता येणार आहे. तसेच नव्याने इच्छुक असलेले व इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादिक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनादेखील एकत्रित येऊन एसपीव्हीद्वारे ग्रीन फिल्ड क्लस्टर पार्क स्थापन करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागादेखील देण्याचे आश्वासन डॉ. सूर्यवंशी यांच्यामार्फत देण्यात आले.बेळे यांनी निमातर्फे दोन वर्षांपासून नाशिकला इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उद्योगांबरोबरच माहिती व तंत्रज्ञान उद्योगवाढीसाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्लस्टर स्थापनेसाठी समितीदेखील तयार केल्याची माहिती दिली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2013 रोजी प्रकाशित
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्लस्टर स्थापन करण्यास चालना
‘निमा’च्या बैठकीतील निर्णय नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीने निमा हाऊस येथे आयोजित बैठक इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक क्लस्टर स्थापन करण्यास चालना देणारे पुढचे पाऊल ठरले.
First published on: 09-07-2013 at 08:16 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electrical and electronic cluster