उपयुक्त माहिती देणारी साधने व ग्रंथसंपदा ऌ ‘कृषी वसंत’ प्रदर्शन परिसर गर्दीने फुलला!
शेतीसंबंधी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, पण सामान्य शेतक ऱ्यांपर्यंत  ते अजूनही पोहोचले नसल्यामुळे विदर्भातील शेतकरी नेहमीच मागे राहिला. कृषी वसंत राष्ट्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतीसंबंधी नवीन तंत्रज्ञानाची माहिती प्रात्याक्षिकाद्वारे दिली जात आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पांजरीतील कृषी वसंत प्रदर्शनाचा परिसर गर्दीने फुलला आहे. उपयुक्त माहिती देणारी साधने व ग्रंथसंपदा उपलब्ध आहे, पण पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानाकडे शेतक ऱ्यांचा कल दिसून आला.
राष्ट्रीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्रासह, पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा, मेघालय, पंजाब, राजस्थान आदी राज्यांतील शेतकरी उपराजधानीत दाखल झाले आहेत. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात ८०० च्या जवळपास शेतीविषयक स्टॉल्स असून प्रत्येक स्टॉलवर शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती देणारे साधने आणि ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तिसऱ्या दिवशी सकाळपासून विविध राज्यातील शेतकरी प्रदर्शनाकडे येत असताना दुपारनंतर कृषी वसंत प्रदर्शनाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. मिळेल त्या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी शेतकरी धडपड करीत होता, मात्र त्यांना गर्दीमुळे पुरेशी माहिती मिळत नव्हती. भारतीय कृषी संशोधन परिषद संलग्नित विविध संस्थांचे स्टॉल्स आहेत.
प्रदर्शनात पशु संवर्धन विभागाच्या स्टॉलवर देशी विदेशी पक्ष्यांची जणू मांदियाळीच अनुभवयास मिळाली. रुबाबदार खिलार, तीन फुटी पंगनूर, धिप्पाड औगोल, गरीब गवळाऊ, लांब शिंगी पंढरपुरी, बुटकी ब्लॅक वंगाल, देवगिरी, औषधी काळा कडकनाथ अशी नावे असलेले विविध पशु या ठिकाणी असून त्यांना पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. या विभागामध्ये पहिल्याच स्टॉलवर रुबाबदार असलेला खिलार,  जातीवंत सोलापूरचा पांढा खोंड सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. प्रदर्शनात संकरित एचएफ जातीची दुधाळ गाय असून ती दिवसाला ३५ लिटर दूध देते. पंरनूर जातीची अवघी तीन फूट उंच असलेली गाय कौतुकाचा विषय होती. आंध्रप्रदेशमध्ये मूळ स्थान असलेल्या ओगोल जातीचा खोंड व गाय ही सवार्ंच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. सर्वात उंच असणारी ही जात १५ लिटर दूध देते. या जातीचे बैल शेतीच्या कामात उपयोगी पडतात. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दोन माहिती देणारे स्टॉल्स असून जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंदर्भात माहिती दिली जात आहे.
केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने देशाची कृषी व संलग्न क्षेत्रातील प्रगती टप्याटप्याने चित्रमय व दृकश्राव्य पद्धतीने दाखविली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीविषयक असलेल्या योजना त्यांच्यापयर्ंत पोहचविण्यासाठी माहिती दिली जात आहे. शेतीकडे उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी बघितले पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांना साहित्य दिले जात आहे. भारतातील शेतकरी विविध स्टॉलवर जाऊन माहिती घेत असला तरी आम्हाला पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रत्यक्ष शेती करताना किंवा एखादे पीक लावताना काय केले पाहिजे हे प्रात्याक्षिकासह सांगा अशी सूचना करीत शेतकरी पुस्तकांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
कृषी विषयक अवजारे या प्रदर्शनात असून त्याची माहिती शेतकरी जाणून घेत आहेत. पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांचा जास्त ओढा असून त्या विषयी माहिती तज्ज्ञांकडून घेत आहेत. कृषी वसंत प्रदर्शनातील गर्दी बघता कार्यकत्यार्ंची संख्या मात्र अपुरी आहे. सरकारच्या विविध विभागातील अधिकारी प्रदर्शनाला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करीत असले तरी शेतकऱ्यांना मात्र अनेक गर्दीमुळे स्टालॅवर माहिती घेताना अडचणी येत आहेत.
प्रदर्शन परिसरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रदर्शनस्थळापासून १ ते २ किमी अंतरावर वाहने ठेवावी लागत आहेत. परिसरात व्हीव्हीआयपी आणि शासकीय वाहनांची गर्दी होत आहे. त्याचा फटका सामान्य लोकांना बसत आहे. दुपारच्यावेळी काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेकांना प्रदर्शनापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. परिसरात पोलिसांचा चोख बदोबस्त आहे.