ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण-मुरबाड परिसरात सशस्त्र क्रांतीचा लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक भाई कोतवाल यांचे अंबरनाथ येथील सहकारी दिवंगत धोंडू देसाई यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्यांची मुलगी संध्या सतीश महाजन यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
अंबरनाथमधील धोंडू देसाई वसाहतीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका समारंभात या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी शिवाजीनगरमधून जाणाऱ्या रस्त्याला धोंडू देसाई यांचे नाव देण्याची मागणी वसाहतीचे संस्थापक अध्यक्ष किसन तारमाळे यांनी केली.
धोंडू देसाई यांची नात सिद्धी महाजन यांनी आजोबांची थोडक्यात महती सांगितली. प्रकाशिका रुपाली सुनील जावडेकर, महेश तपासे, पत्रकार अजित म्हात्रे, अनंत बोंडकर, अनिल काळे, नंदिनी देसाई, प्रवीण देसाई आदी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर जाधव यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2014 रोजी प्रकाशित
स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे चरित्र लेकीने लिहिले
ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण-मुरबाड परिसरात सशस्त्र क्रांतीचा लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक भाई कोतवाल यांचे अंबरनाथ
First published on: 29-04-2014 at 06:54 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freedom fighter fathers character wrote by his daughter