शेतातील काम आटोपून घराकडे निघालेली मुलगी वाटेत ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा संध्याकाळपर्यंत शोध लागू शकला नव्हता. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हिंगोली तालुक्यात हा प्रकार घडला. यशोदा गणेश गिरी (वय १५, गोरीशिकारी, तालुका हिंगोली) असे या मुलीचे नाव आहे. शेतातील काम आटोपून आपल्या घराकडे ती पायी चालत निघाली होती. मात्र, रस्त्यात ओढय़ाला पुराचे पाणी वाहात असताना अंदाज न घेताच यशोदा पाण्यात उतरली. पुढे जाण्याच्या प्रयत्नात ती वाहून गेली. संध्याकाळी उशिरापर्यंत तिचा शोध लागू शकला नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2013 रोजी प्रकाशित
ओढय़ाच्या पुरामध्ये मुलगी वाहून गेली
शेतातील काम आटोपून घराकडे निघालेली मुलगी वाटेत ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. तिचा संध्याकाळपर्यंत शोध लागू शकला नव्हता. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हिंगोली तालुक्यात हा प्रकार घडला.
First published on: 09-07-2013 at 01:47 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl drift in flood