पनवेल येथील लक्ष्मी वसाहतमध्ये एका ६ वर्षांच्या बालिकेवर तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने अतिप्रसंग केला असल्याची धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. याप्रकरणी सदर बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिसांनी या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित बालिका ही घरासमोर खेळत असताना शेजारी राहणारा कन्नमालाल जव्हारलाल पाल या तरुणाने तिला चहा पिण्यासाठी घरात बोलावले. चहा पिण्यासाठी ही बालिका घरात आली असताना, त्याने तिला मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकाराने भेदरलेल्या या बालिकेने हा सर्व प्रकार घरी आल्यावर आईला सांगितला.